Browsed by
Month: August 2018

मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम

मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम

मोदी-शहा पार्टीच्या वतीनं निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात अपयश आल्यामुळं  नाना मार्गांनी लोकांना वेडावण्याचे उद्योग मोदी-शहा पार्टीनं सुरु केलेत.   मोदी हा एक थोर माणूस आहे असं लोकांना पटवणं हा त्यातला एक उद्योग.  मोदींवर टीका करणारी माणसं वाईट्ट असतात असं मोदी-शहा पार्टी सतत सांगत असते. कार्यक्रम-मुद्दे यावरच्या चर्चेपासून दूर नेऊन लोकाना भावनांत गुंतवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जनरल कर्णिक यांच्या नावानं एक वक्तव्य मिडियात फिरवलं जातय. त्याचा सारांश असा –  मोदी हे थोर गृहस्थ असून लोक विनाकारण त्यांच्या…

Read More Read More

नाबार्ड शेतकरी सर्वेक्षण, सरकारांची धोरण फसवाफसवी

नाबार्ड शेतकरी सर्वेक्षण, सरकारांची धोरण फसवाफसवी

नाबार्डचं ताजं सर्वेक्षण प्रसिद्द झालंय. त्यात भारतात शेतकरी कुटुंबं किती आहेत आणि त्यांचं महिना उत्पन्न किती आहे याची पाहणी करण्यात आलीय. त्यानुसार भारतात ४८ टक्के कुटुंबं शेतकरी कुटुंबं आहेत आणि ५२ टक्के शेतकरी नसलेली कुटुंबं आहेत.  सरासरी शेतकरी कुटुंबातलं शेतीपासून मिळणारं उत्पन्न ४३ टक्के आहे आणि उरलेलं उत्पन्न शेतीव्यतिरिक्त कामातून मिळतं. म्हणजेच घरातलं कोणीतरी शेतीसोडून इतर काम करतं, शेतमजूरी किंवा कुठली तरी नोकरी. शेतकरी कुटुंबातला माणूस शेतमजुरी करतो याचं कारण भारतातल्या शेतीचा आकार सरासरी २०७१ एकर आहे. या आकाराची सर्वसाधारण…

Read More Read More

पुरीतलं पाणी आणि गंगेतलं पाणी

पुरीतलं पाणी आणि गंगेतलं पाणी

वडोदरा (बडोदा नव्हे) नगरपालिकेनं पाणी पुरीवर बंदी घातलीय. शहरात नाना रोगांचा उच्छाद झाल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी शहराचं आरोग्य कुठं बिनसतंय ते पहाण्यासाठी चौकशा केल्या, त्यात पाणी पुरीच्या गाड्यांवर त्यांना अस्वच्छता दिसली.  पाणी पुरी मुंबईत असते, गोलगप्पा लखनऊमधे असतो, पुचका बंगालात असतो. कुठंही असो, पाणी पुरीचं पाणी शुद्ध नसतं. ती देणारा माणूस अस्वच्छ असतो, घामेजलेला असतो. ज्या हातानं घाम पुसतो तोच हात पाण्यात घालून ते पाणी पुरीत भरून खाणाऱ्याला देतो. या पाण्याबद्दल न ऐकलेल्या बऱ्या अशा अनंत कहाण्या आहेत. या कहाण्या माहित…

Read More Read More

पाकिस्तानची घसरण – निळू दामले (नवे पुस्तक)

पाकिस्तानची घसरण – निळू दामले (नवे पुस्तक)

धर्मसंकल्पनेचे एक शस्त्र करून दहशतीच्या हिंस्त्रतेतून जगाला हादरवून सोडणार पाकिस्तान हा देश. लोकशाही व्यवस्थेपेक्षा धर्मरक्षण आणि धर्मप्रसार हीच आपल्या देशाची ओळख असं ठासून सांगणारी या देशाची व्यवस्था – वस्तुतः कुठलीही व्यवस्थाच नसणारा. तरीही या देशाला एका पूर्वेतिहासाची भक्कम पार्श्वभूमी आहे. भारतासारखीच विविध जाति-जमातींची अनेकताही या देशाला आहे. परंतु या अनेकतेला नाकारत केवळ इस्लामचेच प्राबल्य पुनःपुन्हा अधोरेखित करणारा हा देश. या देशाचं भवितव्य कसं आहे नेमकं? पाकिस्तानमधली न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थकारण, राजकारण यांचे चेहरे कसे आहेत? सुधारणांना नकारच नोंदवणाऱ्या या देशाची अधोगती अटळ…

Read More Read More

झटपट संस्था, पुढाऱ्यांची गय न करणारी जनता.

झटपट संस्था, पुढाऱ्यांची गय न करणारी जनता.

कर्जतला जियो नावाची एक शिक्षण संस्था निर्माण झालीय. मुकेश अंबानींच्या उद्योगाच्या खात्यावर ती संस्था आहे. संस्थेबद्दल समजलेल्या गोष्टी दोन. एक संस्थेचे चॅन्सेलर डॉ. माशेलकर असतील. दुसरी संस्थेत विद्यार्थ्याला वर्षाला इतकी इतकी फी आकारली जाईल, इतक्या एकरावर इतके चौरस फूट बांधकाम असेल वगैरे. बाकी  माहित नाही. कोण प्रोफेसर्स आहेत, अभ्यासक्रम कसा असेल, तो कसा शिकवला जाईल इत्यादी गोष्टी समजलेल्या नाहीत. सारं काही अजून घडायचं आहे. माशेलकर ही व्यक्ती लोकांना माहित आहे. शिक्षण किंवा संशोधन या बाबतची त्यांची कामगिरी किती व गवगवा…

Read More Read More

ओबामा आणि ट्रंप यांच्यातला फरक

ओबामा आणि ट्रंप यांच्यातला फरक

अँजेला मर्केल यांच्याबरोबर एक जेवण बैठक करायचं आधीच ठरलं होतं.   बर्लीनमधल्या एका हॉटेलात एका हॉलमधे ओबामा आणि मर्केल एकत्र जेवले. तीनेक तास. ओबामांची कारकीर्द संपत होती,  ट्रंप कारकीर्द सुरु होत होती. ट्रंप काय करतील याची भीतीचिंता मर्केलनी व्यक्त केली. ओबामाही चिंतित होतेच, म्हणाले, वाट पाहूया. ब्रीटन युरोपियन समुदायातून बाहेर पडत होतं आणि सीरियन स्थलांतरीतांच्या स्फोटक प्रश्नाला जर्मनी आणि युरोपला तोंड द्यावं लागत होतं. मर्केल चिंतित होत्या. सीरियन स्थलांतरितांना जर्मनीत प्रवेश देण्याच्या त्यांच्या निर्णयावर जर्मन जनता खवळली होती. युरोप आणि…

Read More Read More