पाकिस्तानची घसरण – निळू दामले (नवे पुस्तक)

पाकिस्तानची घसरण – निळू दामले (नवे पुस्तक)


धर्मसंकल्पनेचे एक शस्त्र करून दहशतीच्या हिंस्त्रतेतून जगाला हादरवून सोडणार पाकिस्तान हा देश. लोकशाही व्यवस्थेपेक्षा धर्मरक्षण आणि धर्मप्रसार हीच आपल्या देशाची ओळख असं ठासून सांगणारी या देशाची व्यवस्था – वस्तुतः कुठलीही व्यवस्थाच नसणारा. तरीही या देशाला एका पूर्वेतिहासाची भक्कम पार्श्वभूमी आहे. भारतासारखीच विविध जाति-जमातींची अनेकताही या देशाला आहे. परंतु या अनेकतेला नाकारत केवळ इस्लामचेच प्राबल्य पुनःपुन्हा अधोरेखित करणारा हा देश.

या देशाचं भवितव्य कसं आहे नेमकं? पाकिस्तानमधली न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थकारण, राजकारण यांचे चेहरे कसे आहेत? सुधारणांना नकारच नोंदवणाऱ्या या देशाची अधोगती अटळ असेल तर या देशाचा यापुढील इतिहास कसा आणि कोणत्या दिशेने आपली पावलं उमटवत जाणार आहे? – पाकिस्तानबद्दलचे हे नि असे अनेक प्रश… अपरिहार्यही, गुतांगुतीचेही… या प्रश्नांची विश्लेषक उकल करणारं हे पुस्तक ! शोधपत्रिकारितेच्या माध्यमातून निळू दामले यांनी यापूर्वी आपल्या अनेक पुस्तकांतून विविध देशाबद्दलची मतं, निरीक्षणं अभ्यासपूर्ण पध्द्तीने नोंदवली आहेत. पुरेशा तटस्थपणे मांडलेलं आणि अनेक ग्रंथाच्या वाचनातून आपल्या या भूमिकेला सिध्द्ता प्राप्त करून देणारं त्याचं आणखी हे एक सशक्त लेखन !

हिंसा आणि व्यवस्थेचा अभाव या दोन पात्यांच्या कात्रीत अडकलेल्या पाकिस्तानची ही घसरण… एका अनघड देशाच्या सर्वांगीण प्रगति – अधोगतीचा मांडलेला हा आलेख मराठीत दुर्मीळ म्हणावा लागेल.

मूल्य : रु. २००

पानांची संख्या : १५६

भाषा : मराठी

प्रकाशन वर्ष : ऑगस्ट २०१८

आयएसबीएन (ISBN) : ९७८९३५०७९००१४

प्रकाशक : मौज प्रकाशन गृह, गिरगाव, मुंबई.

ऑनलाईन विक्री वितरण : टेक्नोएग्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस, सांगली.

पुस्तक खरेदीच्या नोंदणीसाठी https://www.technoexam.com/books भेट द्या.

संपर्क :
टेक्नोएक्झाम एज्युकेशनल सर्व्हिसेस, सांगली. फोन : +917304194194

One thought on “पाकिस्तानची घसरण – निळू दामले (नवे पुस्तक)

  1. It’s unfortunate that India has inherited a neighboring country in Pakistan -a fundamentally Islamic nation that actually rivals Saudi Arabia (birth of Islam) in its behavior. Just glimpse into what’s taking place in Turkey (Islam ruled in Europe) as I write this. What’s more, our own India is behaving like a fundamentally Hindu democracy that has sent its Assam State’s genuine Hindu residents scratching their heads over WHERE THEY BELONG, thanks to how Bangladeshis (mostly a fundamentally Islamic society -poorest of them all) infiltrating states of Assam and Bengal -in the process blending in our own authentic society with hard to trace for their origins. Here, BJP’s Saffron movement is the hidden problem -per most of the Indian Newspaper editorials from its THINKTANKS. In short, no matter what, RELIGION is the root cause of it all!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *