Browsed by
Month: February 2022

युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.

युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.

पुतीन काल परवापर्यंत भांडं लपवून ताक मागत होते. आता त्यांनी लपवलेलं भांडं पुढं केलं आहे. रशियन ड्यूमामधे (लोकसभा)   त्यानी तासभर भाषण केलं आणि युक्रेनवर हल्ला करायची परवानगी मागितली. भाषणात पुतीन म्हणाले की युक्रेन हा रशियाचा सांस्कृतीक, राजकीय, ऐतिहासिक भाग आहे, तो रशियापासून वेगळा केलेला आम्ही सहन करणार नाही, आम्ही युक्रेनवर ताबा मिळवणार. युक्रेन आमचाच आहे आणि तो आम्ही ताब्यात घेणार असं पुतीन यांचं अगदी स्वच्छ म्हणणं होतं. रशियन लोकसभा ही पुतीन यांची खाजगी मालमत्ता आहे. तिथं पुतीन जे बोलतील त्याला होय…

Read More Read More

काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस……

काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस ते भाजप ते काँग्रेस……

अश्वनी कुमारनी काँग्रेस सोडली. ते चाळीस वर्षं काँग्रेसमधे होते, काही काळ मंत्री होते.ते पंजाबी आहेत. पंजाबमधून ते राज्यसभेवर निवडून येत असत. पंजाबमधे निवडणुकीचा मोसम असताना त्यानी राजीनामा दिलाय. त्यांच्या काँग्रेस पक्षाला पंजाबात उतरती कळा लागल्याची पार्श्वभूमी पक्षत्यागाला आहे. काही दिवस आधी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडलाय आणि एक स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय. १९८४ साली अमरिंदरनी काँग्रेस सोडली होती, एक वेगळा अकाली दल पक्ष स्थापन केला होता. नंतर यथावकाश त्यांनी त्यांचा अकाली दल काँग्रेसमधे मिसळला आणि ते काँग्रेसचे मुख्यमंत्री…

Read More Read More

सावरकर, मंगेशकर, मोदी.

सावरकर, मंगेशकर, मोदी.

सावरकर, मंगेशकर, मोदी. नुकताच एक वाद झाला. वादाचं मुळ होतं नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतलं भाषण. भाषणात मोदी म्हणाले की हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या गाण्याला संगीतबद्द केल्याबद्दल त्यांना आकाशवाणीनं शिक्षा दिली, नोकरीतून काढून टाकलं. तो काळ काँग्रेस सरकारचा होता, नेहरू पंतप्रधान होते. मोदींचं म्हणणं होतं की नेहरू (काँग्रेस) सावरकरविरोधी होते, हिंदुत्वविरोधी होते आणि त्यांच्या दबावाखाली हृदयनाथ मंगेशकरांवर अन्याय झाला. यातलं तथ्थ्य काय? सुधीर गाडगीळ यानी हृदयनाथ मंगेशकरांकडं या बाबत विचारणा केली. मंगेशकर म्हणाले की १९५७ साली ते आकाशवाणीत नोकरीला नव्हते; मंगेशकर…

Read More Read More

पक्षघरांना दारं नाहीतसं दिसतंय.

पक्षघरांना दारं नाहीतसं दिसतंय.

भाजपचा पुढारी पक्ष सोडून काँग्रेसचा पाठिंबा घेतो. काँग्रेसचा पुढारी पक्ष सोडून भाजपचा पाठिंबा घेतो. पक्षघरांना दारं नाहीतसं दिसतंय

गळेचेपी तंत्रज्ञान,पेगॅसस,भारत सरकार.

गळेचेपी तंत्रज्ञान,पेगॅसस,भारत सरकार.

हेरगिरीचं पेगॅसस हे तंत्र भारत सरकार वापरतं की नाही?  या प्रश्नाचं उत्तर भारत सरकार देत नाहीये. या बाबत प्रश्न विचारल्यावर सरकार म्हणतं की प्रकरण कोर्टात आहे. पेगॅसस हे टेलेफोन दळणवळणाची चोरी करणारं तंत्रज्ञान आहे. एक यंत्र असतं. ते दुरून किवा प्रत्यक्ष टेलेफोनमधे, इंटरनेटमधे,  घुसून  संभाषणं, दिले घेतले जाणारे मेसेजेस पळवतं. इस्रायलमधल्या आयएसओ या कंपनीनं ते तंत्रज्ञान विकसित केलंय, ते यंत्र विकसित केलंय. या यंत्राची टेलेफोनना चिकटण्याची क्षमता मर्यादित असते. पन्नास फोन, शंभर फोन अशा क्षमता असतात. जेवढी क्षमता जास्त तेवढी यंत्राची किमत…

Read More Read More