Browsed by
Category: लेख

रविवार/ मोदी सांगे….

रविवार/ मोदी सांगे….

करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२) आणि करणप्रीत सिंग (२८) या तीन तरूणांना कॅनडाच्या पोलिसांनी हरदीप सिंग निज्जर याच्या खुनाच्या आरोपाखाली पकडलं आहे. तिघंही भारतीय नागरीक आहेत, स्टुडंट व्हिसावर गेली तीन ते पाच वर्षं  कॅनडात रहात आहेत. # हरदीप सिंग निज्जर, व्हँकुव्हरमधला एक खालिस्तान समर्थक. कॅनडातल्या पोलिसांनी निज्जरला जून २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सांगितलं होतं की त्याच्या खुनाचा प्रयत्न होणार आहे, त्यानं सावध रहावं. १८ जून २०२३ रोजी व्हँकुव्हरमधल्या गुरुद्वारातून बाहेर पडत असताना निज्जरवर हल्ला झाला. दोन कार आणि सहा…

Read More Read More

सिनेमे. अमेरिकन फिक्शन

सिनेमे. अमेरिकन फिक्शन

अमेरिकन फिक्शन या चित्रपटाला ऑस्करसाठी ६ नामांकनं होती,   साहित्य कृतीवरून तयार केलेली पटकथा या वर्गातलं बक्षीस ऑस्करनं फिक्शनला दिलंय. पर्सीवल एव्हरेटच्या इरेजर या कादंबरीवरून पटकथा तयार करण्यात आलीय. चित्रपटाचा नायक आहे थेलोनियस एलिसन (टोपण नाव मंक). जेफ्रे राईटनं ही भूमिका केलीय. एलिसन प्राध्यापक आहे, लेखक आहे. आफ्रिकन अमेरिकन (काळा) आहे. वैतागलेला आहे. काळ्यांना गोरे अमेरिकन ज्या रीतीनं पहातात ते त्याला मंजूर नाहीये. आपण काळे आहोत म्हणून काळ्यांच्याच दृष्टिकोनातून जगाकडं पाहिलं पाहिजे ही लोकांची धारणा त्याला मंजूर नाहीये. त्यानं पर्शियन…

Read More Read More

रविवार/युक्रेनी जीवाच्या आकांतानं कां लढत आहेत?

रविवार/युक्रेनी जीवाच्या आकांतानं कां लढत आहेत?

खारकीव, रशियाच्या हद्दीपासून १९ मैल. १९ एप्रिलची संध्याकाळ. आसमंतात सायरन वाजत आहेत, बाँब किंवा गोळा पडण्याची शक्यता आहे. नागरीक सुरक्षित जागी रवाना झाले. खारकीवपासून दूरवर कुठं तरी तोफ गोळे पडले. सायरन थंड झाला. नागरीक रस्त्यावर आले, आपापल्या कामाला लागले.  चौकात माणसांचा गट गोळा झाला. त्यात नागरीक आहेत, सैनिक आहेत. इराण आणि इस्रायलमधील तणावांवर चर्चा चाललीय. ‘इराणच्या दूतावासावर इस्रायलनं हल्ला केला. आता इराण इस्रायल युद्ध सुरु होईल. युद्ध सुरु झाल्यावर अमेरिका इस्रायलकडं मदतीचा ओघ सरकवेल. तसं झालं तर आपले वांधे, आपली…

Read More Read More

पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.

पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.

THE BOOK-MAKERS A HISTORY OF BOOKS ADAM SMYTH || प्रस्तुत पुस्तकात पुस्तक व्यवसायातल्या १८ व्यक्तींची शब्दचित्रं आहेत. १४७६ साली लंडनमधे स्थापन झालेल्या छापखान्याच्या निर्मात्यापासून सुरवेत होते, १८८० सालच्या पहिल्या सर्क्युलेटिंग लायब्ररीपर्यंतचे पुस्तक व्यवहार आणि ते घडवून आणणाऱ्या उद्योगी व्यक्ती या पुस्तकात आहेत. आजच्या डिजिटल पुस्तकांपर्यंत लेखक पोचला आहे. पुस्तक या वस्तूचा एक धावता इतिहास या पुस्तकात आहे. लेखक, प्रकाशक, कंपोझर, प्रिंटर, बाईंडर, विक्रेता असे मिळून पुस्तक छापतात. काळाच्या ओघात पुस्तकाचे आकार आणि रुप बदलत गेलं. आता घरातल्या साध्या टेबलावरही पुस्तक…

Read More Read More

रविवार. ट्रंप खटल्याचं नाट्य

रविवार. ट्रंप खटल्याचं नाट्य

न्यू यॉर्कच्या कोर्टात अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट आणि आजी उमेदवार डोनल्ड ट्रंप यांच्यावर निवडणूक कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून खटला सुरू झालाय. अमेरिकेत ज्यूरी असते. त्यांचा निर्णय निर्णायक ठरत असतो. मतदार यादीतून आणि कार चालवण्याच्या परवाना यादीतून ज्युरर निवडले जातात, रँडम पद्दतीनं. ज्यांची नावं येतील त्यांना न्यायालय बोलावतं, त्यांची चाचपणी करतं आणि खटल्याच्या हिशोबात ते निःपक्षपाती आहेत याची खात्री केली जाते. फिर्यादी आणि बचाव या दोन्ही पक्षाचे वकील या यादीची कसून तपासणी करतात, ज्युरर पक्षपाती असू नयेत अशी अपेक्षा असते.  एक संभाव्य…

Read More Read More

सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.

सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.

परफेक्ट डेज.  जपानी फिल्म. कॅन महोत्सवात दोन पारितोषिकं आणि २०२४ च्या ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी नामांकन.  चित्रपटाचा विषय आहे टोकियोतल्या हिरायामा या  टॉयलेट साफ करणाऱ्या माणसाचं जगणं. बिनलग्नाचा. बहुदा चांगल्या घरातला. बहुदा हेतूपूर्वक हे काम स्विकारलेलं. त्याची बहीण सुस्थितीत आहे. तिला आपल्या भावानं असलं कमी प्रतीचं काम करणं पसंत नाही. हिरायामाला त्याची तमा नाही. तो मनापासून हे काम करतो. दिवसभर काम करतो, रात्री झोपण्यापूर्वी दर्जेदार साहित्य (विल्यम फॉकनर, आया कोडा, पॅट्रिशिया हायस्मिथ ) वाचतो. फोटोग्राफीचा नाद आहे. फोटो काढतो, प्रिंट…

Read More Read More

रविवार/ धोरण तडीस लावणं, चिनी पद्धत.

रविवार/ धोरण तडीस लावणं, चिनी पद्धत.

चीन हा जगाच्या कुतुहुलाचा  विषय असतो. जगातली दोन नंबरची अर्थव्यवस्था चालते तरी कशी याचा नीटसा पत्ता अजून जगाला लागलेला नाही.  चीनमधे सध्या ३.६२ लाख सरकारी उद्योग आहेत. १० वर्षांपूर्वी त्यांची संख्या २.२७ लाख होती. चीनमधे आज  १ लाख खाजगी उद्योग आहेत. सरकारी आणि खाजगी उद्योग एकमेकांच्या मदतीनं अर्थव्यवस्था चालवतात.  चीनला हे कसं काय जमतं? १५वं ते १९वं शतक अशी चारशे वर्षं चीन जगापासून तुटला होता. चीनच्या सम्राटानं चीनचा जगापासूनचा संबंध तोडला होता.चीनमधे काय चाललंय ते कळत नसे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात…

Read More Read More

पुस्तकं/जिवाची किंमत मोजून लढणारी पत्रकार.

पुस्तकं/जिवाची किंमत मोजून लढणारी पत्रकार.

।।  लेखिका मारिया रेसा १९२१ सालच्या शांतता नोबेल पारितोषिकाच्या मानकरी आहेत. पत्रकारीतल्या कामगिरीसाठी त्यांना नोबेल देण्यात आलंय.  मारिया रेसा जन्मानं फिलिपिनो आहेत, त्यांची वाढ आणि आणि शिक्षण अमेरिकेत झालंय. सध्या त्या अमेरिका आणि फिलिपिन्स या दोन्ही ठिकाणी जाऊन येऊन असतात. फिलिपिन्समधे त्या खटले आणि खुनाच्या धमक्यांना तोंड देत असतात. प्रस्तुत  पुस्तकाच्या पहिल्या तीन धड्यांत लेखिकेनं जन्मापासून पत्रकारीची सुरवात करेपर्यंतची हकीकत मांडली आहे. चौथ्या धड्यापासून त्यांनी केलेली पत्रकारी कामगिरी सुरू होते. तेही एका परीनं लेखिकेचं आत्मकथनच आहे. पुस्तकात सर्वात शेवटी लोकशाही…

Read More Read More

रविवार. कचकडी श्रीमंती

रविवार. कचकडी श्रीमंती

प्रसिद्धी आणि पुढारी ही दोन हत्यारं हातात असली की  भिकारी धनाढ्य होतो.   सॅम बँकमन फ्रेड हा ३२ वर्षाचा तरूण अब्जाधीश अमेरिकन  बिझनेसमन आता २५ वर्षं तुरुंगात रहाणार आहे. लोकांचे पैसे लुटणं, फ्रॉड करणं या आरोपाखाली त्याला ११० वर्षांची शिक्षा होणार होती. त्याच्या वकिलांनी मिनतवाऱ्या करून त्याची शिक्षा २५ वर्षांवर आणली.  निकाल जाहीर झाला तेव्हां सॅमचे आई वडील चेहरा झाकून मान खाली घालून बसले होते. सॅम मात्र निर्विकार होता. आपण फ्रॉड केलेला नाही, आपल्या हातून काही लहान चुका झाल्या, काही…

Read More Read More

सिनेमे. झोन ऑफ इंटरेस्ट. कुरतडणारा चित्रपट

सिनेमे. झोन ऑफ इंटरेस्ट. कुरतडणारा चित्रपट

सिनेमे/झोन ऑफ इंटरेस्ट झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला २०२४ च्या ऑस्कर स्पर्धेत उत्कृष्ट चित्रपट (परदेशी) आणि ध्वनी या दोन वर्गात बक्षिसं मिळाली. हा चित्रपट मुंबईत मामी महोत्सवात दिसला होता. ‘झोन’ ही हिटलरच्या छळछावणीची गोष्ट आहे. ऑशविझ या पोलंडमधल्या छावणीत हिटलरनं लाखो ज्यू जाळून मारले. छावणीचा प्रमुख रुडॉल्फ हस छावणीच्या कंपाऊंड भिंतीला लागून असलेल्या घरात रहात असे. रुडॉल्फ हस, त्याची पत्नी हेडविग, त्यांची पाच मुलं. कुटुंब अत्यंत सुखात आणि आनंदात रहात होतं. माणसं जाळण्याचं  महान काम कार्यक्षमतेनं पार पाडल्याबद्दल हिटलरनं हसला…

Read More Read More