सिनेमा. शोक. Nauha.
Nauha. यू ट्यूब. २०२३च्या कॅनमधल्या La Cinef स्पर्धेत मुंबईच्या प्रथमेश खुराणा याची Nauha (शोक) ही फिल्म दाखवली गेली. ही स्पर्धा सिने शाळात शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरवली जाते. २०२३ च्या स्पर्धेत जगभरच्या ४७६ सिनेशाळांमधून २००० अर्ज आले होते. पैकी १६ स्पर्धक विद्यार्थ्यांच्या फिल्म्सची निवड करण्यात आली. त्यात प्रथमेश खुराणाची फिल्म होती. प्रथमेश खुराणा दिल्लीतल्या व्हिसलिंग सिनेकला शाळेचे विद्यार्थी आहेत. नौहा २८ मिनिटांची आहे. छोटी फिल्म या प्रकाराचं वैशिष्ट्यंच असं की एकादा मुद्दा घेऊन ती फिल्म विकसित होते. पूर्ण लांबीची फीचर…