सिनेमे. पुअर थिंग्ज.
पुअर थिंग्ज. यंदाच्या ९६ व्या ऑस्कर स्पर्धेत पुअर थिंग्ज या चित्रपटाला ७ नामांकनं होती, चार मिळाली. योर्गोस लॅंथिमोस या ग्रीक दिक्दर्शकाची ही आठवी फिल्म आहे. उत्तम अभिनेत्री, उत्तम कलादिक्दर्शन, उत्तम रंगवेषभुषा आणि उत्तम चित्रीकरण या वर्गाची पारितोषकं या चित्रपटानं मिळवली आहेत. चित्रपटाच्या सुरवातीला पाठमोरी स्त्री गडद रंगाचा ड्रेस घालून उभी दिसते.अगदी जवळून, नंतर ती लहान लहान होत जाते आणि शेवटी पाण्यात उडी मारताना दिसते. पियानोच्या ठेक्यावर. नंतरच्या दृश्यात एक तरुण मुलगी दिसते, पियानो बडवत असते, कधी कधी पियानं पायानंही वाजवते….