दावोस
दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. दावोस. वसुंधरा टिकवणं, जगातले संघर्ष मिटवून शांतता निर्माण करणं, जगाचा आर्थिक विकास साधणं हे दावोस परिषदेच्या कामकाजाचे मुख्य विषय असतात. यंदा सर्व विषय बाजूला सरले, ट्रंप काय म्हणतात, ट्रंपना तोंड कसं द्यायचं या मुद्द्याभोवती दावोस परिषद फिरली. स्वित्झर्लंडमधे कुरपार्क या गावात दावोस परिषद भरते. तीनेक हजार माणसं जमतात.त्यात पुढारी, कंपन्यांचे मालक,कंपन्यांचे कारभारी असतात. ६५ हजार चौफुचं लाकडी बांधकाम करून पाच इमारतींचा समूह तयार केला जातो. उतरत्या छपरांची शॅले हे स्विस वैशिष्ट्यं आहे. इमारती दर वर्षी उभारतात…