Browsed by
Month: April 2026

न थांबता १३ हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी

न थांबता १३ हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी

।। पट्टेरी शेपटीचा पक्षी. वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम.  एका ऑक्टोबर महिन्यात १३ तारखेला  पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.   उत्तर अमेरिकेल्या थंडीतून निघून ऑस्ट्रेलियाच्या उबदार वातावरणात पोचतो. टास्मानियात उतरण्याची जागा त्याला माहीत असते. त्या जागी तो पूर्वी आलेला असतो. आकाशात कित्येक मैलावर असताना खालच्या जमिनीवरचे अगदी बारीक तपशील दिसतात. शक्तीमान सॅटेलाईट कॅमेऱ्याला दिसावेत  तसे.  त्याला दलदल दिसते….

Read More Read More

पेपर विकणाऱ्याचा राष्ट्रीय सन्मान

पेपर विकणाऱ्याचा राष्ट्रीय सन्मान

 अली अकबर पॅरिसच्या सेंट जर्मन या वॉर्डात अजूनही पेपर विकतात. त्यांचं वय आहे ७३. अलिकडं लोक त्याला पेपर विकत घेण्यापूर्वी थांबवतात. विचारतात ‘अरे तूच ना तो अली अकबर? तुलाच प्रेसिडेंट मॅक्रॉननी राष्ट्रीय किताब देऊन गौरवलं होतं ना?’ अली अकबरचा एलीसी पॅलेसमधे एका समारंभात सत्कार झाला, फ्रेंच अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्याच्या गळ्यात एक पदक टांगलं. मॅक्रॉन म्हणाले ‘तू फ्रान्सचा गौरव आहेस. तू पॅरिसची सेवा केलीस त्या बद्दल फ्रान्स तुझा ऋणी आहे.’ मॅक्रॉननी पदक देताना एक छोटंसं भाषण केलं. त्या भाषणात…

Read More Read More

अमेरिकेचं महागडं इराण युद्ध

अमेरिकेचं महागडं इराण युद्ध

इराण युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालं. इराण युद्धात अमेरिकेनं विमानवाहू नौकांसह १५ युद्ध नौका आणि १०० लढाऊ विमानं वापरली. अमेरिकन नौदलातल्या २६ टक्के बोटी आणि हवाई दलातली २५ टक्के विमानं अमेरिकेनं युद्धात लोटली आहेत. एकूण सैनिक सुमारे ५० हजार. अमेरिकेनं इराणवर १३ हजार हवाई हल्ले केले. अमेरिकेचं अंदाजपत्रक ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांना संसदेनं युद्धावर किती खर्च झाला अशी विचारणा केली. दोन वेळा. अधिकारी म्हणाले आकडा देता येणार नाही कारण तो सतत बदलत असतो, नेमका खर्च किती झाला ते सांगता येणार…

Read More Read More

देश उंदराचा पुतळा उभारतो

देश उंदराचा पुतळा उभारतो

 कंबोडियानं मागावा नावाच्या  उंदराचा एक पुतळा आंगकोर वाट या स्थळी उभारलाय. आफ्रिकेतून हा उंदीर कांबोडियानं आयात केला होता.   मागावा ७० सेंमी लांबी-उंचीचा होता. पुतळा २.२ मीटर उंचीचा आहे. आंगकोर वाट हा एक मंदिरांचा काँप्लेक्स आहे, तिथं अनेक मंदिरं आहेत. ११ व्या शतकात विष्णू या देवाची आठवण म्हणून तत्कालीन राजा सूर्यवर्मन या राजानं आंगकोर वाट उभारलं. नंतर त्याचं रुपांतर बुद्ध मंदिरांमधे झालं. आंगकोर वाटमधल्या १००० मंदिरांमधे हा उंदीर पुतळा असेल. विष्णू,बुद्ध, उंदीर. उंदराचा पुतळा कां? मागावानं १०० भूसुरूंग शोधले. मागावा…

Read More Read More

इराणयुद्ध स्थगिती मुनीरची करामत

इराणयुद्ध स्थगिती मुनीरची करामत

 पाकिस्ताननं इराण युद्धाला स्थगिती देण्यासाठी मध्यस्थी केली. अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमधे भेटले. एकमेकांची तोंड पहायला तयार नसलेली माणसं समोरासमोर कशी काय बसली? हे कसं घडलं? पाकिस्तानचे सरसेनापती असीम मुनीर यांनी वरील घटना घडवून आणली. असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्याशी फोनवर थेट बोलले.  ट्रंपच्या मते असीम मुनीर हा त्यांचा ग्रेट फ्रेंड आहे. मुनीर यांचा फोन ट्रंप पटकन घेतात. मुनीरनी भेट मागितली तर ट्रंप पटकन तयार होतात. मुनीरना चमकोगिरीसाठी काही तरी हवं होतं, इराण युद्ध कामी आलं. पाकिस्तानची राजवट…

Read More Read More

मेरिलीन मन्रो, सौंदर्य आणि अभिनय

मेरिलीन मन्रो, सौंदर्य आणि अभिनय

 मेरिलीन मन्रो या नटीची  जन्मशताब्दी इंग्लंडमधे साजरी होतेय. ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट वर्षभर तिचे चित्रपट दाखवणार आहे, तिच्या चित्र-पोस्टर्सची प्रदर्शनं भरवणार आहे, भाषणं आणि चर्चासत्रं ठेवणार आहे. १९७० नंतर जन्मलेल्या माणसांना मन्रो आठवणं कठीण आहे. ती १९६२ साली वारली. १९६१ साली तिचा शेवटला चित्रपट पडद्यावर आला होता. १९४७ मधे मन्रोनं पहिला चित्रपट केला. मन्रोनं ३० चित्रपट केले.  Gentlemen Prefer Blondes (1953), Niagara (1953), The Seven Year Itch (1955), Some Like It Hot (1959), The Misfits (1961) हे मन्रोचे गाजलेले चित्रपट. तीस…

Read More Read More

इराण युद्ध स्थगिती, एक नाटक?

इराण युद्ध स्थगिती, एक नाटक?

 डोनल्ड ट्रंप यांनी इराणी सिविलायझेशन नष्ट करण्याचा कार्यक्रम दोन आठवड्यासाठी स्थगित केला आहे. जगानं सध्या तरी हुश्श केलं आहे. ७ एप्रिलच्या सकाळी आठ वाजता ट्रंप यांनी इराणला अंतिम इशारा दिला होता. २४ तासाची मुदत देतो, होरमुझ सामुद्रधुनी मोकळी करा, नाही मान्य केलंत तर चोविस तासात इराण नष्ट करेन, इराण पुन्हा अश्मयुगात जाईल. पाठोपाठ तिकडं इस्लामाबादमधे प्रधान मंत्री  शहाबाज खान त्यांचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या सोबत चर्चा करू लागले.  २८ फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवर हल्ला सुरु केला त्यानंतर   खान यानी…

Read More Read More

चित्रपट. गाझात मुलीचा मृत्यू

चित्रपट. गाझात मुलीचा मृत्यू

हिंद रजबच्या विनवण्या ‘द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ या  चित्रपटाला २०२६ च्या ऑस्करला नामांकन मिळालं होतं. हिंद रजब नावाची एक सहा वर्षाची मुलगी आहे. रामल्ला या वेस्ट बँकमधल्या गावात ती कारमधे अडकून पडलीय. तिच्या सोबत तिचे चुलतेचुलती आहेत. दोघंही रक्तबंबाळ होऊन मेलेत. तिच्या सोबत तिची चार भावंडं आहेत. पैकी तिघं मेलेत, एकच जिवंत आहे. इस्रायली सैन्यानं तिचं गाव उध्वस्थ केलंय. सारं कुटुंब चंबुगवाळं आटोपून दुसऱ्या जागी आसरा घ्यायला निघालं असताना इस्रायली सैन्यानं त्यांच्या कारवर गोळीबार केलाय. हिंद जखमी आहे.  हिंदजवळ…

Read More Read More

इराण झोल

इराण झोल

इराण झोल अमेरिकेनं इराणशी युद्ध पुकारलं. ती नुसती कारवाई नव्हती, ते युद्ध होतं. वुई आर ॲट व वॉर असं डोनल्ड ट्रंप म्हणाले. इराणशी कां युद्ध पुकारलं? एक कारण इराणकडली अण्वस्त्रं नष्ट करणं, अण्वस्त्रं तयार करण्याची इराणची क्षमता नष्ट करणं. इराणकडं अण्वस्त्रं आहेत काय? कोणतीच विश्वास ठेवण्यालायक माहिती उपलब्ध नाही. इतके किलो इतके टक्के विकसित युरेनियम इराणकडं आहे असं म्हणतात. किती आणि किती टक्के हे माहित नाही. इराणनं तयार झालेली स्फोटकं (बाँब) डब्यांत भरून ठिकठिकाणी नेऊन ठेवली आहेत. ती कुठं आहेत…

Read More Read More