Browsed by
Month: May 2026

राजाची भूमिका करणारी निर्धन स्त्री

राजाची भूमिका करणारी निर्धन स्त्री

राजाची भूमिका करणारी निर्धन स्त्री  एल्सी सलडाणाचं वय आहे ८१. कॅलिफोर्नियात फ्रेस्नो या गावात ती रहाते. घरांची साफसफाई हे तिचं काम. आपण ज्याला झाडूपोछा म्हणतो ते काम ती पोटासाठी करते. दिवसभर काही घरांत ती जाते. संध्याकाळ झाली की घरी जाऊन कपडे बदलते आणि बारमधे जाते.   बारमधे ती काय करते? ती जे सादर करते त्याला ड्रेग (Drag) असं म्हणतात. ड्रेग या नाट्य प्रकारात पुरुष स्त्रियांच्या भूमिका करतात, स्त्रिया पुरुषांच्या भूमिका करतात. या कलाप्रकाराला व्हॉडविल, बहुरंगीढंगी, कलाप्रकार असं म्हणता येईल. कलाकार…

Read More Read More

ट्रंपनी काय मिळवलं

ट्रंपनी काय मिळवलं

ट्रंपनी काय मिळवलं? डोनल्ड ट्रंप दोन दिवस चीनमधे राहिले, सी जिनपिंग यांच्याशी बोलले. सतत जिनपिंगची खुशामद करत होते.जिनपिंग गंभीर होते. फार तर दहा वाक्यं बोलले असतील. दोनेक तास दोघं एकांतात होते. तिथं काय ठरलं ते कळायला मार्ग नाही.  खाजगी चर्चेत काय बोलणं झालं ते जिनपिंग जाहीर करत नाहीत. मागं एकदा कॅनडाचे  पंतप्रधान ट्रुडो यांनी खाजगी बोलण्यातल्या काही गोष्टी पत्रकारांना सांगितल्या. जिनपिंग वैतागले. त्यांनी ट्रुडोना खाजगीतच झापलं, पुन्हा तुमच्याशी बोलणार नाही असं सांगून टाकलं.  तैवाननं स्वतंत्र होण्याच्या गोष्टी करू नयेत, दूरवर…

Read More Read More

ट्रंप जिनपिंग कसे वावरतात?

ट्रंप जिनपिंग कसे वावरतात?

 सी जिनपिंग आणि डोनल्ड ट्रंप एका विशाल उद्यानात बसले होते. डाव्या सोफ्यावर ट्रंप, समोरच्या सोफ्यावर जिनपिंग. ट्रंप गुडघ्यावर दुसरा पाय दुमडून काहीसे वाकून जिनपिंग यांच्याशी बोलत होते. जिनपिंग सोफ्याच्या पाठीवर दोन्ही हात ताणून बसले होते. ट्रंप काही तरी महत्वाचा मुद्दा जिनपिंगना सांगत होते. जिनपिंग अगदी आरामात,रिलॅक्स मूडमधे ‘हं, सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते…’ अशा आविर्भावात होते.  जिनपिंग ट्रंपपासून अंतर राखून होते. शरीरानं आणि मनानंही. ट्रंपचा चेहरा काहीसा ताणलेला होता. जिनपिंग यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या, कोणतीही भावना त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. असाच…

Read More Read More

बिच्चारे स्टार्मर

बिच्चारे स्टार्मर

बिच्चारे स्टार्मर  कीर स्टार्मर यांना ब्रिटीश संसदेत भरभक्कम बहुमत आहे. तरीही त्यांचं प्रधान मंत्रीपद डळमळीत झालं. मंत्रीमंडळातल्या  ४मंत्र्यांनी राजीनामे दिले,  ८० खासदारांनी राजीनामा मागितला.   दोनच वर्षांपूर्वी ज्या माणसाला भरघोस बहुमत दिलं त्याला त्याचा पक्ष आणि देश कां घालवून द्यायला निघालाय?  लोकांनी त्यांची नाराजी मे च्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या निवडणुकीत व्यक्त केली. युकेच्या स्कॉटलंड, वेल्स आणि इंग्लंड या तीनही विभागात स्थानिक संस्थांची निवडणूक झाली.   स्टार्मर यांच्या लेबर पार्टीला जबर मार बसला. ५०९६ जागांसाठी निवडणुक झाली. लेबर पार्टी १०६८…

Read More Read More

घंटा, व्हिस्की

घंटा, व्हिस्की

चार्ल्स (राजे तिसरे चार्ल्स) व्हाईट हाऊसच्या प्रांगणात ट्रंप यांच्या शेजारी बसले तेव्हां तसे धास्तावलेच असणार. कारण ट्रंप यांच्या जिभेला हाड नाही हे त्यांना माहित होतं. ब्रीटनशी बिनसलं असल्यानं ट्रंपचा तोंडाचा पट्टा सुटण्याची शक्यता होती. त्यांच्या सचीवानं त्यांना सांगून ठेवलं असणार ‘सर, सांभाळा.’ ट्रंपनी फटका दिलाच. अधिकृत स्वागत समारंभात समोर शेकडो लोक आणि जगातले करोडो लोक हजर असताना ट्रंप म्हणाले ‘माझ्या आईचा चार्ल्सवर क्रश होता’. जेन झी च्या भाषेत क्रश; जुन्या मराठीत बोलायचं तर ट्रंपची आई चार्ल्सवर लाईन मारत होती. वर्गातल्या…

Read More Read More

विजयचा विजय का झाला

विजयचा विजय का झाला

 २०२४ साली स्थापन झालेल्या तमिळ वेत्री कळहम (तवेक) पक्षानं २०२६ सालच्या २३४ सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत १०८ जागा मिळवणं ही सामान्य गोष्ट नव्हे. थलपती विजय (सी जोसेफ विजय) यांनी ती करामत करून दाखवलीय.    विजय यांनी पहिल्यांदाच निवडणुक लढवली, मुख्यमंत्री स्टालिन यांचा ८७०० मतांनी पराभव केला. स्टालिन द्रमुक या १९६७ पासून आलटून पालटून सत्तेत असलेल्या तामिळनाडूत रुतलेल्या द्रविड पार्टीचे नेते होते. स्टालिन यांना करुणानिधी यांचा वारसा लाभला होता.  तामिळनाडूमधे एक राजकीय पॅटर्न दिसतो. द्रमुकनं काँग्रेसची सत्ता उलथवली (१९६७). अद्रमुकनं द्रमुकची सत्ता…

Read More Read More

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात डोनल्ड ट्रंप जिथं हजर रहाणार होते त्या हॉटेलमधे घुसण्याचा प्रयत्न कोल ॲलन नावाच्या माणसानं केला. पोलिसांनी त्याला अडवलं. डोनल्ड ट्रंप वाचले. ट्रंप आणि त्यांचे सत्ताधारी नेते यावर कोल ॲलन याचा राग होता. ट्रंप यांच्यावर आधी दोन वेळा हल्ले झाले. एकदा ट्रंप यांच्या निवासस्थानाबाहेर एक शस्त्रधारी सापडला होता. ट्रंप तेव्हां परगावी होते. गेल्या वर्षी चार्ली कर्क या ट्रंप समर्थक कार्यकर्त्यावर हल्ला झाला, कर्कचा मृत्यू झाला. चार्ली युटा विद्यापिठात विद्यार्थ्यांसमोर ट्रंप यांचा प्रचार करत होता. चार्ली…

Read More Read More

नेपोलियनचा आवडता परफ्यूम

नेपोलियनचा आवडता परफ्यूम

नेपोलियनचा आवडता परफ्यूम आपण सर्रास ओ द कोलोन हे परफ्युम वापरतो. नाना कंपन्यांनी तयार केलेलं कोलोन परफ्युम आपण वापरतो. अलीकडं ओ द कोलोनमधे कंपन्यांनी आपापले स्वतंत्र गंध मिसळले आहेत. बाजारात मिळणारं कोलोन हे एका परीनं भेसळच असतं. कोलोन हे परफ्युम आहे. कधी कधी परफ्युमला अत्तर असंही संबोधलं जातं. ते बरोबर नाही. परफ्युम अल्कोहोलमधे सुगंधी तेल मिसळून तयार केलेलं असतं. अत्तरात अल्कोहोल नसतं, अत्तर नैसर्गिक तेलात तयार करतात, त्यात वापरलेली सुगंधी द्रव्यं फुलांमधून, वनस्पतीतून घेतली जातात. ते सुगंधी घटक नैसर्गिक असतात…

Read More Read More

पॅलेस्टाईन, प्रश्न भावनिक.

पॅलेस्टाईन, प्रश्न भावनिक.

पॅलेस्टाईन संघर्ष समजून देणारं पुस्तक ।।  Tomorrow Is Yesterday. Robert Malley, Hussein Agha ।। पॅलेस्टिनी, इस्रायल यांच्यात १९९३ चे १९९५ या काळात झालेल्या ऑस्लो कराराबद्दल हे पुस्तक आहे.  १९४८ मधे इस्रायल स्थापन झाल्यापासून इस्रायल संघर्ष सुरु झाला. पॅलेस्टिनी म्हणत होते ज्यूंनी आपल्याला न विचारता पॅलेस्टाईनमधे घुसखोरी केलीय, त्यांना घालवून द्या, पॅलेस्टाईन आमचं आहे. बरोब्बर दुसरं मानस ज्यूंचं म्हणजे इस्रायलचं होतं. ही आमची मूळ भूमी आहे, ती पूर्णपणे आमच्या ताब्यात आली पाहिजे, तिथं पॅलेस्टिनी नकोत. युद्ध झाली. दंगे झाले. दुभंगलेलं पॅलेस्टाईन…

Read More Read More

झुंज

झुंज

झुंज कार्टाजेना. द. अमेरिकेतल्या कोलंबियातलं ५०० वर्षांपासून विकसित होत असलेलं शहर. ५०० वर्षांपूर्वी शहराभोवती बांधलेल्या तटभिंतीला लागून जुनी घरं आहेत. एका घरात तीन साडेतीनशे माणसं किंचाळत आहेत.  ओरडत आहेत. एका हातात कोल्ड ड्रिंकची बाटली. दुसऱ्या हातात नोटांची चळत. माणसं बेभान आहेत. समोर कोंबड्या झुंजत आहेत.    दोन्ही कोंबडे अटीतटीनं लढतात.   एक कोंबडा जखमी होतो, दूर पळायचा प्रयत्न करतो. जिंकायच्या वाटेवरचा कोंबडा उन्मादानं त्या जखमी कोंबड्यावर हल्ला करतो. चोचेनं भोसकतो. तंगडीच्या मागल्या बाजूला असलेल्या काट्यानं ओरबाडतो. रक्ताची चिळकांडी उडते. झुंजीसाठी…

Read More Read More