घंटा, व्हिस्की
चार्ल्स (राजे तिसरे चार्ल्स) व्हाईट हाऊसच्या प्रांगणात ट्रंप यांच्या शेजारी बसले तेव्हां तसे धास्तावलेच असणार. कारण ट्रंप यांच्या जिभेला हाड नाही हे त्यांना माहित होतं. ब्रीटनशी बिनसलं असल्यानं ट्रंपचा तोंडाचा पट्टा सुटण्याची शक्यता होती. त्यांच्या सचीवानं त्यांना सांगून ठेवलं असणार ‘सर, सांभाळा.’
ट्रंपनी फटका दिलाच. अधिकृत स्वागत समारंभात समोर शेकडो लोक आणि जगातले करोडो लोक हजर असताना ट्रंप म्हणाले ‘माझ्या आईचा चार्ल्सवर क्रश होता’. जेन झी च्या भाषेत क्रश; जुन्या मराठीत बोलायचं तर ट्रंपची आई चार्ल्सवर लाईन मारत होती.
वर्गातल्या मुलामुलीवर, बिल्डिंगमधल्या मुलामुलीवर लाईन मारणं एके काळी कॉमन होतं. आपल्यापासून प्रचंड दूर असलेल्या, कधीही आपण ज्या व्यक्तीच्या वाऱ्यालाही जाणार नाही अशा व्यक्तीवरही लाईन मारली जात असे. उदा. मधू बालावर लोक फार लाईन मारायचे. माधुरी दिक्षीतवरही ‘मरणारे’ लोक खूप होते. माधुरीनं नेने डॉक्टरशी लग्न केलं तेव्हां लाखो मराठी तरूण-प्रौढ दुःखी झाले. आमची आठवण माधुरीला आली नाही याचा त्यांना राग आला होता. लाईन मारणं मनातल्या मनात प्रेम करणं.
लाईन मारणं वगैरे बोलणं गप्पांचा भाग असे.
ट्रंप ते जाहीरपणे म्हणून मोकळे झाले.
चार्ल्सनी अगदी किंचित करमणुक झाल्याचा भाव चेहऱ्यावर ठेवला.
राजे लोकांच्या खाजगी जीवनात खूप मज्जा असणार, पण ती व्यक्त न करणं, ती जाहीर न करणं हे राजसंस्कृतीचं वैशिष्ट्यं. चार्ल्सचा आजोबा सहावा जॉर्ज कसा सणसणीत चावट-अश्लील विनोद करत असे त्याची झलक क्राऊन या मालिकेत दिसते. राजा असला तरी त्यालाही कंगोरे असणारच ना, फक्त त्याला बिचाऱ्याला बोलता येत नाहीत.
ट्रंपची आणखी एक गंमत. चार्ल्स जॅकेट घालून वावरतात. नॉर्मल जॅकेट. आपण जॅकेटला कोट म्हणतो.जॅकेटवर लष्कर, नौदल, हवाई दल यांनी दिलेली पदकंपदकं चिकटवलेली असतात. चार्ल्सच्या गळ्यातही नेहमी एक पदक असतं. या पदकांचा शौर्याशी संबंध नसतो. ती सन्मान करण्यासाठी दिलेली असतात.
ट्रंप चार्ल्सच्या पदकांकडं पाहून म्हणाले ‘ तुम्ही नक्कीच खूप शूर असणार’
चार्ल्स काय बोलणार? त्यांच्या मनात आलं असणार ‘ या गावरान माणसाला राजाचा थाट कसा समजणार? यानं तर पायाला काही तरी झालंय असं खोटंच सांगून सैन्यात जाणंही टाळलं.’
चार्ल्स मनात म्हणाले असणार ‘ ट्रंपना सहन केल्याबद्दलही मला एक पदक मिळेल आणि मी ते छातीवर चिकटवीन.’
एका समारंभात ट्रंप म्हणाले ‘ अमेरिकेनं मदत दिली म्हणून तुम्ही दुसऱ्या महायुद्धात वाचलात. नाही तर तुम्ही जर्मन बोलू लागला असतात’
हे खरं आहे की अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली नसती तर चर्चील यांची भाषणं ब्रीटनला वाचवू शकली नसती, जर्मनीनं ब्रीटन गिळला असता. पण या घटनेचा उपयोग ब्रिटीश माणसाचा पाणउतारा करण्यासाठी करणं हे सभ्यपणाचं लक्षण नाही.
चार्ल्सही कमी नाहीत.
त्यांनी ट्रंपना एक पितळी घंटा भेट दिली. या घंटीवर ट्रंप १९४४ असे शब्द कोरलेले होते. एचएमएस ट्रंप नावाची एक पाणबुडी ब्रिटीश नौदलात होती, त्या बोटीवरची ही घंटा. बोटीला ट्रंप हे नाव कोणा ट्रंप या व्यक्तीवरून दिलेलं नव्हतं, ट्रंप म्हणजे हुकमी एक्का, ट्रंप म्हणजे विजय असा अर्थ घेऊन पाणबुडीचं तसं नामकरण केलं होतं.
आपलं नाव पाहून ट्रंप खुष झाले.
तिकडे ब्रिटीश लोक गालातल्या गालात हसले. घंटा या शब्दाला ब्रिटीश बोलीभाषेत अश्लील अर्थ आहे. मराठी आणि हिंदीही घंटा हा शब्द त्याच अर्थानं वापरला जातो. तुम्ही काहीही करा तुम्हाला घंटा मिळेल, घंटाही मिळणार नाही असं माणसं म्हणतात.
ट्रंप आणि चार्ल्स यांचं खाजगीत गुफ्तगूं झालं. चहा पीत असताना.खास ब्रिटीश स्टाईलच्या किटल्या आणि नक्षीदार कप. किटलीतला चहा गार होऊ नये म्हणून किटलीवर नक्षीदार टोपी. चहा ओतण्यासाठी ठेवलेली नाजूक गाळणी. साखर घेण्यासाठी नखरेल चमचे.
काय बोलले असतील?
चार्ल्सचा भाऊ एप्सटिन घोटाळ्यात सापडला. राजघराण्यानं त्याचं युवराजपद काढून घेतलं,त्याला घरातून हाकललं. ट्रंपना ते आवडलं नसणार. ‘तुम्ही भावावर अन्याय केलाय, त्याच्याशी नीट वागला नाहीत..’ असं ट्रंप म्हणाले असण्याची शक्यता आहे.
‘डायना प्रकरण तुम्ही चांगलं हाताळलंत. तुम्ही हुशार आहात.इथे एप्सटिन प्रकरण माझी वाट लावणारसं दिसतंय. मला सल्ला हवाय….’ ट्रंप हळूच म्हणाले असतील?
‘तुमचा तो स्टार्मर मूर्ख आहे. इराणात मी गंडलोय, एकटा पडलोय, स्टार्मर मला मदत करायला तयार नाही. त्याला समजावा. अमेरिकेला मदत केली तर तुमच्यावरची सगळी टॅरिफ काढायला मी तयार आहे. पण स्टार्मर ऐकायलाच तयार नाही.’ ट्रंप नक्की म्हणाले असणार.
चार्ल्स दरबारी आदब आणि दरबारी आदत असलेला माणूस. म्हणाले असणार ‘तुमच्या सूचनेची दखल घेत आहोत, जे शक्य आहे, जे योग्य आहे ते केलं जाईल.’
इराण युद्धात पडण्याचा मूर्खपणा करायला जगातलं कोणीही तयार नाही. चार्ल्स तरी त्यात कशाला पडतील. दौऱ्यात इकडल्या तिकडल्या आणि गंमतीशीर गोष्टी पार पडल्या. दौऱ्याचा देखावा पार पडला.
ट्रंपनाही चार्ल्सला काही तरी रिटर्न गिफ्ट देणं भाग होतं. आपल्या खाजगी ट्विटर हँडलवर जाहीर केलं की ब्रिटीश स्कॉच व्हिस्कीवरची टॅरिफ ते कमी करत आहेत. स्कॉचच्या बाटल्या आनंदानं डुलत अमेरिकेत पोचणार.
घंटा आणि व्हिस्कीची देवाण घेवाण करत चार्ल्स यांचा दौरा संपन्न झाला.