चित्रपट : सेफ हाऊस. विषण्ण करणारा अनुभव.
नेटकंच पार पडलेल्या (२०२५) गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सेफ हाऊस’ या चित्रपटाची उत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली.नॉर्वेजियन एरिक स्वेन्सनने या चित्रपटाचं दिक्दर्शन केलंय. चित्रपट युनेस्को आणि आयसीएफटी या दोन संस्थांची निर्मिती आहे. सेफ हाऊस म्हणजे सुरक्षित घर. सेफ हाऊस या शब्दाना एक विशिष्ट अर्थ आहे. गुप्तचरांना कोणाला तरी मारायचं असतं, कुठं तरी घातपात घडवायचा असतो. त्यासाठी त्यांना आपली ओळख, नावगाव पुसावं लागतं, लोकांच्या नजरेत भरणं टाळावं लागतं. उघड झाले की मेलेच. अशा गुप्तचरांना एका सेफ हाऊसमधे ठेवलं जातं. सेफ हाऊसमधे …