बर्लिन परिषद
युरोप आणि अमेरिका यांच्यात दुरावा युरोप आणि अमेरिका मित्रदेश राहिलेले नाहीत, एकमेकाविरोधात संघर्षाला सिद्ध झाले आहेत. बर्लिन परिषदेमधे जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्झ म्हणाले- अमेरिकेनं ‘मेक अमेरिका ग्रेट’ हे स्वार्थी आर्थिक-सांस्कृतीक धोरण अवलंबून नेतृत्व गमावलं आहे. अमेरिका आमचा मित्र आहे, होता, भविष्यात असायला हवा. आमचा विषारी आणि द्वेष करणाऱ्या भाषणाला विरोध होता. आम्हाला पर्यावरण सुधारायचं होतं. आम्हाला मुक्त बाजार हवा होता. ते सारं ट्रंपनी नाकारलंय. अमेरिका आणि युरोपची ताकद बरोबरीनं काम करण्यामुळं निर्माण झाली होती. अमेरिकेला कोणतीही सोबत नकोय. मर्झ यांच्या…