इराण झोल
इराण झोल अमेरिकेनं इराणशी युद्ध पुकारलं. ती नुसती कारवाई नव्हती, ते युद्ध होतं. वुई आर ॲट व वॉर असं डोनल्ड ट्रंप म्हणाले. इराणशी कां युद्ध पुकारलं? एक कारण इराणकडली अण्वस्त्रं नष्ट करणं, अण्वस्त्रं तयार करण्याची इराणची क्षमता नष्ट करणं. इराणकडं अण्वस्त्रं आहेत काय? कोणतीच विश्वास ठेवण्यालायक माहिती उपलब्ध नाही. इतके किलो इतके टक्के विकसित युरेनियम इराणकडं आहे असं म्हणतात. किती आणि किती टक्के हे माहित नाही. इराणनं तयार झालेली स्फोटकं (बाँब) डब्यांत भरून ठिकठिकाणी नेऊन ठेवली आहेत. ती कुठं आहेत…