पॅलेस्टाईन, प्रश्न भावनिक.
पॅलेस्टाईन संघर्ष समजून देणारं पुस्तक ।। Tomorrow Is Yesterday. Robert Malley, Hussein Agha ।। पॅलेस्टिनी, इस्रायल यांच्यात १९९३ चे १९९५ या काळात झालेल्या ऑस्लो कराराबद्दल हे पुस्तक आहे. १९४८ मधे इस्रायल स्थापन झाल्यापासून इस्रायल संघर्ष सुरु झाला. पॅलेस्टिनी म्हणत होते ज्यूंनी आपल्याला न विचारता पॅलेस्टाईनमधे घुसखोरी केलीय, त्यांना घालवून द्या, पॅलेस्टाईन आमचं आहे. बरोब्बर दुसरं मानस ज्यूंचं म्हणजे इस्रायलचं होतं. ही आमची मूळ भूमी आहे, ती पूर्णपणे आमच्या ताब्यात आली पाहिजे, तिथं पॅलेस्टिनी नकोत. युद्ध झाली. दंगे झाले. दुभंगलेलं पॅलेस्टाईन…