१४ लाख डॉलरला एक कबूतर
१४ लाख डॉलरला एक कबूतरकाही दिवसांपूर्वी आरमेंडो नावाचं एक कबूतर एका चिनी धनिकानं बेल्जियममधे १४ लाख डॉलरला विकत घेतलं. नाही म्हटलं तरी जरासा कमीच भाव आला. २०१९ साली एक कबूतर १९ लाख डॉलरला विकलं गेलं होतं. व्यवस्थित प्रशिक्षित केलेल्या कबूतराला चिनी लोक एकेका कबूतराला दहा बारा लाख डॉलरही द्यायला तयार होतात.जगात कबूतरांचं एक नवं मार्केट तयार झालंय.कबूतराला येवढी किमत कां येते?कारण कबूतरामधे एक अद्भुत शक्ती आहे. कबूतराला आपण कुठं वाढलोय त्याची आठवण रहाते, शेकडो किमी अंतरावरून कबूतरं आपल्या स्थानावर परत…