ट्रंपशाही झिडकारणारा ब्राझीलचा अध्यक्ष
ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रंप यांच्यात सध्या जाहीर झकाझकी चाललीय. ट्रंप दादागिरी करत आहेत आणि दा सिल्वा जाहीरपणे ट्रंपांना झिडकारत आहेत, ट्रंपांवर टीका करत आहेत. युरोपसह जगभरचे पुढारी ट्रंप यांना चुचकारत असताना दा सिल्वा सभ्य भाषेत ट्रंप यांच्या दादागिरीला नकार देत आहेत. ट्रंपनी ब्राझीलवर ५० टक्के जकात लादली. जकात लादल्यावर ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा म्हणाले ‘ जकात आर्थिक कारणांसाठी लादलेली नाही, राजकीय कारणांसाठी लादलेली आहे. जकात लादल्याचे परिणाम आहेत. काही उत्पादनं ब्राझीलमधे महाग होतील, ब्राझिली जनतेला त्रास…