लेबनॉनमधल्या बिनतारी हिंसा
जगणं नव्हे मरणं आपल्या हाती लेबनॉनमधे लागोपाठ दोन दिवस बिनतारी साधनांचे स्फोट झाले. त्यात ३२ माणसं मेली, ३१५० माणसं जखमी झाली. साधनं हाताळतांना कोणाचे हात जळले, कोणाचे चेहरे जळले. पहिल्या दिवशी स्फोटात मरण पावलेल्यांच्या मयतासाठी दुसऱ्या दिवशी गोळा झालेल्या लोकांच्या हातातल्या साधनांचा स्फोट झाला. जगभर या बातमीमुळं माणसं हादरली आहेत. माणसं मारण्याचं हे नवं तंत्र आपल्याला कुठं नेणारे अशी चिंता लोकांना लागलीय. पेजर, सेलफोन, रेडियो, टीव्ही, वॉकीटॉकी इत्यादी सर्रास वापरली जाणारी साधनं अशा रीतीनं जर वापरली जाणार असतील तर लोकांचं…