बांगला देश कसा वाचेल?
महंमद युनुस बांगला देशाचे अंतरीम कारभारी पंतप्रधान झाले आहेत. आंदोलकांनी आग्रह धरल्यानं त्यांनी देश चालवायची जबाबदारी घेतलीय. शेख हसीना यांच्या १५ वर्षाच्या भ्रष्ट कारकीर्दीला कंटाळून तरूणांनी आंदोलन केलं. आंदोलनात ३०० पेक्षा अधिक माणसांचा बळी गेला. ३ हजार नोकऱ्यांसाठी ४ लाख तरूणांना अर्ज करावे लागावे यावरून बांगला देशची अवस्था काय होती ते स्पष्ट होतंय. सत्ताधारी अवामी लीग हा पक्ष आणि पक्षाची युवक शाखा यांनी (त्यांच्या गुंडगिरीनं ) देशाचा ताबाच घेतला होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तेव्हां मागं अवामी लीग युवा शाखेचे गुंड…