पुस्तकं/डार्विनच्या पत्रांचा संग्रह
डार्विनची १६ हजार पत्रं. विश्वाचा उत्क्रांती सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२) यांच्या पत्रव्यवहाराचा ३० वा खंड नुकताच प्रसिद्ध झाला. सगळे खंड छापील आहेत, डिजिटल आहे, ऑन लाईन उपलब्ध आहेत. ऑन लाईन खंड वाचण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. या संग्रहात १६ हजार पत्रं आहेत. चार्ल्स डार्विन दररोज पत्र लिहित असत. आलेली पत्रं तारेत घालून ठेवत. तारा भरून जात. मग काही पत्रं डार्विन जाळून टाकत. डार्विन यांचा जगाशी आणि ज्ञानाशी संबंध टिकला तो त्यांच्या पत्रांमधून. डार्विन यांचा पत्रव्यवहार अनेकांगी होती. त्यात…