लढाऊ वारकरी संपादक
अनंतराव भालेराव अनंतराव भालेरावांचं लहानपण घडलं वारकरी कुटुंबात, वारकरी वातावरणात. तिथं त्यांची नैतिक घडण झाली. अनंतराव भालेरावांचं तरूणपण घडलं हैदराबाद मुक्ती संग्राम चळवळीत. तिथं त्यांची राजकीय घडण झाली. अनंतराव अचानक, त्यांच्या ध्यानी मनी नसतांना संपादक झाले. तिथून नैतिक, राजकीय मूल्यांच्या पायावर त्यांची पत्रकारी घडण. ।। अनंतराव शाळेत आणि कॉलेजात जायच्या वयात असताना मराठवाड्यात हैदराबाद संस्थानातून मुक्त होण्याची चळवळ आकाराला येत होती. अनंतराव चळवळीत ओढले गेले. हैदराबाद मुक्ती लढ्याचं संघटन करणाऱ्या काँग्रेस आणि नंतर स्टेट काँग्रेसमधे अनंनतराव पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले….