पुस्तकं/आजच्या पिढीला कळेल असं शेक्सपियरचं नाटक. विंटर्स टेल.
फोल्जर्स या प्रकाशन संस्थेनं शेक्सपियरचं विंटर्स टेल या नाटकाची सटीक संहिता नव्यानं प्रसिद्ध केलीय. शेक्सपियर इंग्रज होता. कवी होता, नाटककार होता. १५८९ ते १६१३ या काळात त्याची बहुतांश नाटकं रंगमंचावर आली.त्याची एकूण नाटकं ३८. जगात अशी एकही भाषा नाही जिच्यात शेक्सपियरचं भाषांतर झालेलं नाही. शेक्सपियरचं एक तरी नाटक आपण मंचावर आणलं पाहिजे असं प्रत्येक दिक्दर्शकाला वाटतं. शेक्सपियरच्या एका तरी नाटकात आपण भूमिका करावी असं प्रत्येक नटाला वाटतं. शेक्सपियरच्या नाटकांवरून, त्यातल्या कथानकांवरून जगातल्या मास्टर दिक्दर्शकांनी सिनेमे केलेत. आताशा काय झालंय की…