पुस्तकं/बेन गुरियन यांची कुलंगडी
BEN-GURION’S SCANDALS How the Hagannah and The Mossad Eliminated Jews Naeim GILADI ।। बेन गुरियन यांची कुलंगडी. थियोडोर हर्झल, चाईम वाईझमन आणि बेन गुरियन हे इसरालचे निर्माते आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळं इसरायल निर्माण झाला. शीर्षकामधे स्कँडल्स असा शब्द वापरला असला आहे. परंतू पुस्तकात कुलंगडी बाहेर काढलेली नाहीत. बेन गुरियन यांच्या वर्तणुकीचं विश्लेषण लेखकानं केलं आहे. बेन गुरियन हे इसरायलचे निर्माते आहेत आणि लेखक त्या निर्मात्यावरच टीका करतोय म्हटल्यावर पुस्तकाकडं सावधपणे पहायला हवं. एका देशाच्या निर्मात्यावर लिहिणारा हा लेखक कोण आहे…