सिनेमा. ऑस्करसाठी मल्याळी २०१८
येत्या म्हणजे २०२४ च्या ऑस्करसाठी 2018. Every One is a Hero ही मल्याळी फिल्म निवडण्यात आलीय. ‘२०१८’ मधे केरळातल्या एका गावाची गोष्ट आहे. एक कुठलंही असावं असं एक गाव असतं. माणसं आपापल्या अस्तित्वासाठी धडपडत असतात. माणसंच ती. त्यांची सुखदुःख, त्यांचे ताणतणाव, त्यांची भांडणं असं सारं काही जसं कुठंही असावं तसं गावात असतं. पूर येतो. अन्यथा लडखडणारी माणसं घट्ट पाय रोवून उभी रहातात, आपापले स्वार्थ आणि हेवेदावे विसरून पुराला तोंड देतात.अनूप नावाचा एक फौजी माणसं मारली जातात त्यानं व्यथित होऊन…