रविवारचा लेख जी २०-गुऱ्हाळ. शब्दांचाच गूळ, शब्दांचीच ढेप.
९ आणि १० सप्टेंबरला जी २० परिषदेचं भारताच्या अध्यक्षतेचं वर्ष समाप्त झालं, त्या दिवशी एक शिखर परिषद दिल्लीत पार पडली. गेल्या वर्षी इंडोनेशियाकडं अध्यक्षपद होतं, पुढल्या वर्षी ब्राझीलकडं अध्यक्षपद असेल. युरोपियन युनियनसह इतर १९ देश या गटाचे सदस्य आहेत, यंदा द. आफ्रिका या नव्या देशाला या गटात घेण्यात आल्यानं आता जी २१ असं तिचं नामकरण होईल. मोठ्ठे जीडीपी ही गटाची मुख्य कसोटी आहे. त्यामुळंच अमेरिका, रशिया, चीन इत्यादी देश या गटात आहेत. जी २०० ही युनायटेड नेशन्स, विश्वबँक, विश्व नाणेनिधी…