रविवारचा लेख हवाई टॅक्सी, एक अनावश्यक चंगळ
दुबाईमधे २०२६ मधे हवाई टॅक्स्या सुरू होणार हे नक्की. हवाई टॅक्सी म्हणजे तीन माणसांना घेऊन हवेत उडणारी टॅक्सी. दुबाईतल्या हॉटेलच्या गच्चीवरून किंवा बागेत तयार केलेल्या हेलेपॅडवरून ही टॅक्सी हवेत झेपावेल आणि विमानतळावर पोचेल. एक चालक आणि तीन प्रवासी इतकी माणसं या टॅक्सीत बसतील. ही टॅक्सी हेलेकॉप्टरसारखीच असेल. म्हणजे तिला विमानासारख्या धावपट्टीची आवश्यकता नसेल, ती सरळ हवेत झेपावेल. ती पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल, बॅटरीवर चालणारी असेल. एकदा चार्ज केलेली बॅटरी चाळीस मिनिटं चालेल. या विमानाचे उत्पादक म्हणतात की त्याचा काहीही आवाज होणार…