वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?
प्रिगोझीनचा जन्म १९६१ सालचा. वयाच्या अठराव्या वर्षी त्याला चोरी करतांना लेनिनग्राड पोलिसानी पकडलं. दोन वर्षाची शिक्षा झाली. लहान वयाचे असल्यानं त्याला एका कारखान्यात काम करून शिक्षा भरून काढायची परवानगी कोर्टानं दिली, तुरुंगवास टळला. या काळात प्रिगोझीन यांचं चोऱ्या करणं चालूच होतं. एका घरात घुसून टोळीनं वाईनचे ग्लासेस पळवले. त्यांची एक टोळी होती. शिक्षेचा कालावधी संपल्यावर एकदा टोळी दरोडे घालायला निघाली. एका घरात घुसून त्यांनी २५० डॉलर लुटले, पळाले. नंतर ही लूट एंजॉय करायला ते रस्त्यावर हिंडत असताना एक सुंदर स्त्री…