शुक्रवार/ कल्पित आणि वास्तव. ब्रिटीश राणी. क्राऊन.
क्राऊन ही नेटफ्लिक्सवरची सहा सीझन्सची मालिका नुकतीच संपली. दृश्य माध्यमातला हा एक महत्वाचा टप्पा मानला जाईल इतकी ही मालिका प्रभावशाली होती. ब्रीटनची राणी हे एक गुढ असतं. राणी काय करते असं कुतूहल कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. त्यातून राणी ही देशाची प्रमुख. ती जगते कशी, ती आई म्हणून कशी असते, पत्नी म्हणून कशी असते, ती देश प्रमुख म्हणून काय करते इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात असं माणसाला वाटणं स्वाभाविक आहे.पण राजवाडा आणि राणी प्रसिद्धीपासून दूर असल्यानं आपलं ते कुतुहूल न शमता शिल्लक…