सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.
परफेक्ट डेज. जपानी फिल्म. कॅन महोत्सवात दोन पारितोषिकं आणि २०२४ च्या ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी नामांकन. चित्रपटाचा विषय आहे टोकियोतल्या हिरायामा या टॉयलेट साफ करणाऱ्या माणसाचं जगणं. बिनलग्नाचा. बहुदा चांगल्या घरातला. बहुदा हेतूपूर्वक हे काम स्विकारलेलं. त्याची बहीण सुस्थितीत आहे. तिला आपल्या भावानं असलं कमी प्रतीचं काम करणं पसंत नाही. हिरायामाला त्याची तमा नाही. तो मनापासून हे काम करतो. दिवसभर काम करतो, रात्री झोपण्यापूर्वी दर्जेदार साहित्य (विल्यम फॉकनर, आया कोडा, पॅट्रिशिया हायस्मिथ ) वाचतो. फोटोग्राफीचा नाद आहे. फोटो काढतो, प्रिंट…