सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.
माहितीपट मेरियुपोलमधे २० दिवस. रशियाच्या फौजा युक्रेनच्या हद्दीवर २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात उभ्या राहिल्या. युक्रेन-रशियाच्या पूर्व हद्दीवर मेरियुपोल हे शहर आहे. तिथं. पुतीननं या घटनेला युद्ध असं नाव दिलं नाही, विशेष लष्करी कारवाई असं पुतीन म्हणाले. एपी, असोसिएटेड प्रेस, या वृत्तसंस्थेच्या लक्षात आलं की १.५ लाख सैन्य ही काही सामान्य लष्करी कारवाई नाही. एपीनं ही घटना कव्हर करायचं ठरवलं. एपीचे कॅमेरामेन आणि बातमीदार एक टीम करून मेरियुपोलमधे पोचले. बातमीदार पोचले त्या पहिल्या दिवशी सारं शांत होते. दुसऱ्या दिवशीपासून मेरियुपोलपासून काही…