नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल
ब्रॅड पिटची दी वॉर मशीन नावाची फिल्म नुकतीच प्रदर्शित झाली. नेटफ्लिक्सवर. अमेरिकन जनरल मॅकक्रिस्टल यांना जनरल पदावरून हाकलणं या घटनेवर आधारलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. ब्रॅड पिटनं जनरल मॅकमोहनची भूमिका केलीय. मॅकमोहनला अफगाणिस्तानात पाठवलं जातं. मॅकमोहन म्हणतो की त्याला युद्ध करायचं नाहीये, त्याला अफगाणिस्तानची नव्यानं बांधणी करायची आहे. अफगाणिस्तानातली अफूची शेती बंद करून कापूस पिकवायची व्यवस्था मॅकमोहनला करायची आहे. त्याला शाळा काढायच्या आहेत. वगैरे. हे सारं हेलमांड प्रांतातल्या अफगाणांना सांगायला मॅकमोहन जातो तो प्रचंड शस्त्रं घेऊन. त्याच्या भोवताली रणगाडे,…