पेशावरची शाळा
पेशावरच्या शाळेत सात जिहादींनी 132 मुलं मारली. दोन चोरलेल्या गाड्यांतून जिहादी शाळेत पोचले. पंधरवडाभर आधी पाक-अफगाण सरहद्दीवर त्यांचं प्रशिक्षण झालं होतं, हल्ल्याचं नियोजन झालं होतं. एका अभ्यासवर्गासाठी हॉलमधे जमलेल्या विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार झाला. पळणाऱ्याना पाठून गोळ्या घातल्या. घाबरून थिजून बसलेल्या मुलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलं मेली आहेत की नाहीत ते तपासून त्यात जिवंत आढळलेल्यावर गोळ्या झाडल्या. रक्ताची थारोळी आणि प्रेतांचा खच एकदा पाहून झाल्यावर जिहादीनं आपल्या नेत्याला फोनवरून विचारलं ” मुलं मारून झालीत, आता काय करू.” पलिकडून उत्तर…