Browsed by
Author: niludamle

आरक्षण या  ‘ संकुचित राजकीय ‘ उपायामुळं मराठा समाजाचं नुकसान होतंय. राज्याची राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सत्ता बहुतांशी मराठा जातीतल्या माणसांकडं आहे. गेली कित्येक वर्षं. भारतामधे समृद्धीचा मार्ग उद्योगातून  नव्हे, सरकारातून जात असल्यानं मराठा समाजातील माणसांनी सरकार हे माध्यम वापरून समृद्धी मिळवली.  सरकार या वाटेचा फायदा मर्यादित लोक घेऊ शकतात. सर्वांनाच तिथं प्रवेश मिळणं कठीण असतं.  मराठा समाजातील पुढाऱ्यांनी या वाटेचा ताबा घेतला, अनेक मराठा माणसं समृद्धीपासून वंचित राहिली. धड सरकार नाही आणि धड उद्योजकताही नाही या त्रिशंकू अवस्थेत मराठा समाजातली…

Read More Read More

लोकशाहीतली कोंडी

लोकशाहीतली कोंडी

महाराष्ट्रात दुर्दैवानं एकाही पक्षाला निर्णायक बहुमत मिळालं नाही. एकाच चरित्राच्या दोन्ही काँग्रेस पक्षांनी आपसात भांडण केलं, वेगळे झाले. एकाच चरित्राच्या सेना-भाजपनं आपसात भांडण केलं. वेगळे झाले. परिणामी भाजपला बहुमत नसतांना राज्य करावं लागतंय. महाराष्ट्रात लोकांची मतं, मतदानाच्या सवयी इत्यादींचा हिशोब मांडला तर जनतेतच मतभेद आहेत. त्यामुळं असं घडलंय. भाजपनं कितीही चलाखी दाखवली तरी त्यांना राज्य टिकवणं शक्य होणार नाही. पक्षीय राजकारण पद्धतीमुळं सेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष मंडळी आपापला लोण्याचा गोळा मागत रहाणार.  न मिळाल्यास सरकार पाडण्याची धमकी देणार, खरी करून…

Read More Read More

फ्युडलिझम म्हणजे काय

फ्युडलिझम म्हणजे काय

राजकारणावर बोलत असतांना अमूक एक समाज फ्यूडल आहे असा उल्लेख सतत येत असतो. भारतात आणि विशेषतः पाकिस्तानात अजूनही समाज फ्यूडल आहे असा आरोप केला जातो.  फ्यूडलचा अर्थ काय? मध्य युगात लॅटिन भाषेत feudum असा शब्द होता, त्याचा अर्थ fee असा होता. फी म्हणजे मोबदला, एकादी गोष्ट केल्याबद्दल दिली जाणारी किमत, वस्तू किंवा पैशाच्या रुपात दिला जाणारा मोबदला. मध्य युगात युरोपमधे राजे, सरदार, पुंड असे कोणीही कुठल्या तरी विभागावर हल्ला करून तो ताब्यात घेत. सतत युद्ध चालत. यामुळं माणसं आणि समाज…

Read More Read More

महाराष्ट्रातला सत्तेचा खेळ

महाराष्ट्रातला सत्तेचा खेळ

सत्तेच्या खेळातली खडाखडी सेना महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसणार आहे. अगदी पहिल्या दिवसापासून मोदी आणि शहा यांची व्यूह रचना पक्की होती. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेत घेऊन किंवा सत्तेच्या बाहेर ठेवून खतम करायचं.  निवडणुकीच्या आधी जागावाटपाचा घोळ चालू असताना भाजपची भूमिका पक्की होती. किती आणि कुठल्या जागा ही चर्चा केवळ एक खेळ होता.सेनेनं दुय्यम स्थान स्वीकारावं आणि न स्वीकारल्यास युती तुटावी असं ठरलेलं होतं. फक्त युती तुटल्याचं खापर सेनेच्या माथ्यावर फुटावं अशी व्यूहरचना अगदी पहिल्या दिवसापासून होती.निर्णायक बहुमताला लागतील तेवढ्या जागा भाजपला मिळाव्यात,…

Read More Read More

वाघा हद्दीवरचा हल्ला

वाघा हद्दीवरचा हल्ला

वाघा हद्दीच्या पलिकडं, पाकिस्तानात, ६०० मीटरवर एका तरुणानं स्वतःच्या अंगावरच्या बाँबचा स्फोट करून साठेक माणसं मारली. खरं म्हणजे त्याला थेट हद्दीवर येऊन अधिक माणसं मारायची होती. वाघा हद्दीवर एक दार आणि दरवाजा आहे. तिथं दररोज संध्याकाळी पाक आणि भारतीय सैनिक झेंडा उतरवतात आणि मराठी नाटकात शोभावा असा मेलोड्रामा करतात. दोन्ही बाजूला हज्जारो लोक हा मेलोड्रामा पहायला जमा होतात. तेव्हां अशी काही हजार माणसं जमल्यास मारायची असा त्या आत्मघाती तरूणाचा इरादा होता. परंतू रेंजर्स या पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त असल्यानं…

Read More Read More

शहरं आखायला हवीत.

शहरं आखायला हवीत.

श्रीनगरमधे पाऊस संकटासारखा कोसळला. पाणीच पाणी साचलं. सारं श्रीनगर एक सरोवर झालं होतं. नॉर्मल वेळी आपण रस्त्यावर उभे रहातो, कठड्याला टेकून, पलिकडं दल सरोवर असतं. कठड्यावरून उडी मारून खाली उभ्या असलेल्या छोट्या होडक्यात बसायचं आणि दलच्या किनाऱ्याला पार्क केलेल्या हाऊस बोटीत जायचं. हे झालं नेहमीचं. २०१४ च्या पावसाळ्यात दल सरोवर आणि रस्ता यात फरकच राहिला नाही. सरोवर कुठलं आणि शहर कुठलं ते कळत नव्हतं.  सगळं शहर पाण्याखाली. इमारतींचा पहिला मजला पाण्याखाली. माणसं दुसऱ्या मजल्यावर आणि गच्चीत मुक्काम करून राहिली. कित्येक…

Read More Read More

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी सरकार चालवते.

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी सरकार चालवते.

पक्ष – आमदार आऊटसोर्स करणारी कंपनी. कंपनी  सरकार चालवते. ।। महाराष्ट्रातल्या मतदारांनी चार पक्षांमधे मतं विभागली. भाजपला २८ टक्के, सेनेला २० टक्के, काँग्रेसला १८ टक्के आणि राष्ट्रवादीला १७ टक्के मतं दिली. चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोडली होती, भाजप-सेनेची युती मोडली होती. म्हणजेच स्वतंत्रपणे या पक्षांना समाजात काय स्थान आहे ते सिद्ध झालं. मतं आणि जागा यांचं गणीत कधीच जुळत नाही. मतांच्या प्रमाणात जागा कधीच मिळत नाहीत. भाजपच्या  २८ टक्के मतांना २८ टक्के जागा म्हणजे ८० जागा मिळायला…

Read More Read More

सहस्र चंद्र दर्शन म्हणजे काय

सहस्र चंद्र दर्शन म्हणजे काय

आपल्याकडं सहस्र चंद्र दर्शन नावाचा एक विधी म्हणा, सोहळा म्हणा, आहे. माणूस ऐंशी वर्ष जगतो म्हणजे तो एक हजार चंद्र पहातो. हिंदू परंपरेनुसार सहस्र चंद्र दर्शन विधी केला की त्या माणसाला मरेपर्यंत बळ प्राप्त होतं, त्याच्यातला अहं कमी होतो. येवढंच नव्हे तर पुढला जन्म घेताना त्या व्यक्तीला आईच्या गर्भातच बळ प्राप्त होऊन पुढला जन्मही ती व्यक्ती बळवान होते. आज भारतातल्या माणसाचं सरासरी जीवनमान ७२ वर्षाचं झालं आहे. माणसं ८० वर्ष अगदी सहजपणे जगतात.  शंभर वर्षापूर्वी सरासरी जीवनमान ५० च्या आतच…

Read More Read More

मलाला आणि कैलास सत्यार्थी

मलाला आणि कैलास सत्यार्थी

कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई या दोघाना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालंय.  कैलास ‘बचपन बचाव’ आंदोलनाचे निर्माते आहेत. मुलांना शिक्षण मिळालं तर त्यांचा विकास होईल. गरीब घरातली माणसं मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात तेव्हां ती गरीबी वाढवत असतात. मुलाला शिक्षण मिळालं तर पुढं त्यांचा चांगला विकास होतो, गरीबी नष्ट होते असं ते म्हणतात. दोन प्रकारची कामं ते करतात. एक म्हणजे जिथं जिथं मुलांना कामावर ठेवून, बेकायदेशीर रीत्या त्यांच्याकडून कामं करवून घेतात त्या संस्थांवर छापा मारतात. त्या संस्थांना शिक्षा करतात, मुलांना सोडवतात, त्याना…

Read More Read More

लातूरचे जयंत वैद्य गुरुजी गेले

लातूरचे जयंत वैद्य गुरुजी गेले

लातूरचे जयंत वैद्य, वैद्य गुरुजी, गेले. सुरवातीला काही दिवस त्यांचं शरीर त्यांना साथ देईनासं झालं. नंतर त्यांचं मन आणि मेंदूही त्यांना मदत करेनासे झाले होते. वैद्य गुरूजी मुळातले लातूरचे नव्हेत. स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे यांच्या आग्रहाखातर ते लातूरच्या पॉलिटेक्निकमधे शिकवण्यासाठी रुजू झाले. काही काळ शिकवलं खरं पण नंतर त्यांनी स्वतःचा मोटार रिवाईंडिंचा व्यवसाय सुरु केला. खरं म्हणजे शिकवणं आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी त्यांच्या रक्तात नव्हत्या. अभ्यासाअंती त्यांचे काही सामाजिक, राजकीय इत्यादी विचार तयार झाले होते. एक तरफी. त्या विचारांवर ते…

Read More Read More