‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.
एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो? व्हेलबेक या फ्रेंच कादंबरीकारानं तशी कल्पना करून फ्रेंच समाज कसा बदलू शकतो याचं वर्णन सबमिशन या कादंबरीत लिहिलंय. २०१५ शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या संपादकांना आयसिसच्या जिहादींनी पॅरिसमधे ठार मारलं त्याच दिवशी ही कादंबरी फ्रेंचमधे प्रसिद्ध झाली. आता या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालंय. ।। व्हेलबेकच्या कादंबरीचा काळ आहे, २०२०. त्या वर्षी फ्रान्समधे सार्वत्रिक निवडणुका होतात. चार पक्ष निवडणुकीत उभे असतात. कोणालाच बहुमत मिळत नाही. पक्षांमधली फूट वापरून, पक्षांच्या आपसातल्या मारामारीचा उपयोग करून मुस्लीम…