इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.
इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली. Heretic Why Islam Needs A Reformation Now Ayaan Hirsi Ali Harper Collins. ० पेशावरमधील बाच्चा खान शिक्षण संस्थेमधे घुसून तालिबानी घातपात्यांनी तीसेक विद्यार्थ्यांना ठार मारलं. मेलेले विद्यार्थी मुसलमान होते. मारणारे तालिबानी मुसलमान होते. सुरवात अल कायदानं केली. अल कायदातून फुटून आयसिसनं स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन केली. अल कायदातून स्फूर्ती घेऊन अल नुस्र फ्रंट, बोको हराम या संघटना स्थापन झाल्या. गेल्या वीसेक वर्षात या संघटनांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, इजिप्त, येमेन, इथियोपिया, सोमालिया,सुदान,नायजेरिया, इंडोनेशिया, सीरिया, इराक,…