दुसऱ्या महायुद्दावरची डॉक्युमेंटरी
Apocalypse: The Second World War. सहा भागातली पाच तास वीस मिनिटांची मालिका. दुसऱ्या महायुद्धावरची डॉक्युमेंटरी. सध्या नेट फ्लिक्सवर पुन्हा पाहिली जातेय. पुन्हा अशासाठी म्हणायचं की ही मालिका २००९ साली तयार झाली. युरोपातल्या बहुतेक सर्व भाषांत तिच्या प्रती निघाल्यात. लोकांना ही डॉक्युमेंटरी आवडतेय. साधारणपणे त्याच वर्षी दुसरं महायुद्ध याच विषयावर World War II In HD Colour ही १३ भागात पसरलेली १० तास ३३ मिनिटांची मालिका प्रकाशित झाली होती. अपोकलिप्स लोकांना आवडतेय कारण त्या मालिकेत दुसरं महायुद्ध हा महाविषय सव्वापाच तासात चित्रपटाच्या…