फॉयल
जेम्स फॉयल या अमेरिकन छायापत्रकाराचा शिरच्छेद आयसिस या दहशतवादी संघटनेच्या माणसानं इराकमधे केला. जेम्स फॉयल २०१२ पासून सीरियात होता. त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. कोणी म्हणतं की असदच्या लोकांनी त्याला पकडलं होतं, कोणी म्हणतं की आयसिसनं पकडलं होतं. अमेरिकेनं जंग जंग पछाडलं पण त्याचा पत्ताही लागू शकला नव्हता. अचानक त्याच्या शिरच्छेदाची व्हिडियो क्लिप दाखवण्यात आली तेव्हां त्याचा पत्ता लागला. ब्रिटीश घाटणीचं बोलणाऱ्यानं शिरच्छेद केला होता. अमेरिकेनं इराकमधे आयसिसवर हवाई हल्ले केल्याचा निषेध आणि इशारा म्हणून हा उद्योग आयसिसनं…