पन्हा एकदा धर्म मुद्दा आहे धर्म आणि संस्कृती,धर्म आणि चालीरीती यांच्यातल्या नात्यांचा. पन्नास हजार ते एक लाख वर्षं हा धर्म, देव, श्रद्धा यांच्या निर्मितीचा काळ मानला जातो. सभोवतालचं वास्तव आणि माणसाचं जगणं-मरणं यातल्या अनेक गोष्टींचा खुलासा विज्ञान-तंत्रज्ञान-उपकरणं यांच्या नसण्यामुळं होत नव्हता. त्या त्या काळात लोकांनी देव, उपासना इत्यादी गोष्टी कल्पिल्या. माणसं काहीही खात होती. कोणालाही मारत होती. कोणाशीही शरीर संबंध ठेवत होती. शक्तीवान प्रबळ ठरत असे. काळ पुढं सरकल्यावर जगात नाना ठिकाणी नाना स्थितीनुसार देव, माणसांनी उपासना या गोष्टी समाज…
जिहादी आणि जैन सध्या एकाच वेळी घडणाऱ्या घटना. इराकमधे आयसिस या जिहादी संघटनेनं त्यानी मिळवलेल्या टीचभर प्रदेशात खलिफाची, म्हणजे प्रेषितांच्या प्रतिनिधीची, म्हणजे इस्लामची खिलाफत जाहीर केली आहे. ती साऱ्या जगात करायची त्यांची इच्छा आहे. या खिलाफतमधे स्त्रिया बुरख्यात वावरतील, त्याना घरात रहावं लागेल, समाजात मद्य नसेल, समाजात संगित-चित्रपट-नाटक इत्यादी नसेल. गुजरातेत पालिताणा नावाचा एक भाग आहे. तिथं जैनांची धार्मिक स्थळं आहेत. असा पालिताना पूर्ण मांसाहारमुक्त करायचं गुजरात सरकार ठरवतंय, त्याला सध्याच्या भारत सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता…
भविष्यातली संस्कृती शहरी संस्कृती असेल. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/cityspace/entry/india-is-country-of-cities-not-villages
शहरं. आज जी काही आहेत त्यांची दुरवस्था आहे. जी काही नव्यानं होताहेत त्यांचीही दुरवस्था आहे. याचं एक कारण शहराचा कारभार हे आहे. न्यू यॉर्क, लंडन या शहरांना एक स्वतंत्र जबाबदार मेयर असतो. शहर कसं चालवायचं ते तो ठरवतो. ते ठरवण्याचा, नियोजन अमलात आणण्याचे अधिकार त्याला असतात. तसंच काही तरी भारतात व्हायला हवं. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/cityspace/entry/city-want-resposible-owner
इराकचं त्रिभाजन आयसिस या नावाच्या जिहादी संघटनेनं मोसुल शहर ताब्यात घेऊन बगदादकडं आगेकूच चालवली आहे. आयसिस म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. आयसिसला भूमध्य सागराच्या काठावरच्या देशांचं इस्लामी राज्य तयार करायचं आहे. त्यात इराक, सीरिया, इसराल, जॉर्डन, लेबेनॉन इत्यादी देश येतील. या सर्व देशात सध्या इस्लामी राज्यंच आहेत. मग आणखी वेगळं इस्लामी राज्य म्हणजे काय? कुणास ठाऊक. आयसिसच्या इस्लामी राज्यात फूटबॉल खेळायला परवानगी नसेल, धुम्रपान आणि मद्यपानाला परवानगी नसेल,स्त्रिया काम करणार नाहीत आणि बुरख्यात असतील, नवरा, भाऊ, बाप असा…
माझं दुष्काळ-सुकाळ हे मौजेनं प्रकाशित केलेलं पुस्तक छापून झालंय. लवकरच ते पुस्तकांच्या दुकानात विकण्यासाठी जाईल. जतमधे कित्येक शतकं पाऊस पडतो पण लहरी. त्यामुळं पिकाचं गणित कोसळतं. जेवढा पाऊस पडतो तो खरं म्हणजे जतच्या जनतेला अगदी सुखात ठेवण्यासाठी पुरेसा आहे येवढंच नव्हे तर शेतीतलं उत्पन्न घेऊनही पाणी उरू शकतं. तरीही दर वर्षी तिथं टंचाई निर्माण होते. वर्षाचे चार एक महिने पाण्याची टंचाई असते, पाणी बाहेरून आणाव लागतं.गुरं जगवण्यासाठी चारा बाहेरून आणावा लागतो, लोकांना जगवण्यासाठी नाना प्रकारची मदत करावी लागते. कित्येक शतकं…
मोदी पर्वाची सुरवात झाली आहे. मोदींची तुलना जगातल्या इतर दोन नेत्यांशी होतेय. मार्गारेट थॅचर आणि देंग. थॅचरनी ब्रीटनचं ग्रेटनेस पुन्हा परत आणायचं ठरवलं होतं. थॅचर एका दुकानदाराची कन्या होत्या. मोदी छोट्या व्यवसायिकाकडं जन्मले आणि वाढले आणि भारताचं गतवैभव पुन्हा मिळवण्याचा त्यांचा इरादा आहे. थॅचर एकहाती कारभार करत, त्यांना त्यांच्या कामात कोणाची ढवळाढवळ चालत नसे. नको असलेली माणसं त्या धडाधड काढून टाकत. मोदीही आपल्या पेक्षा वेगळ्या विचारांची माणसं सहन करत नाहीत. थॅचर उघड आणि टोकाच्या भांडवलशाही-मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या समर्थक होत्या. सरकार…
मुंबईत ग्रँट रोड स्टेशनसमोर एक रेस्तराँ होतं. परवापरवापर्यंत. शंभरवर्ष झाली त्या रेस्तराँला. इमारत जुनी झाल्यानं ती पाडून तिथं नवी इमारत उभी रहाणार असल्यानं मेरवान बंद झालंय. मुंबईतल्या किती तरी पिढ्यांनी मेरवानचे केक, पुडिंग, बनमस्कार, खारी आणि चाय पचवलेत. पत्रकार, विचारवंत, वकील, विद्यार्थी, राजकीय कार्यकर्ते, कवी, लेखक, भणंग इत्यादी लोकांना मेरवानमधे आश्रय होता. गोल टेबलं, लाकडी खुरच्या, मोठ्ठे गरगरते पंखे, आरसे, मेन्यूच्या पाट्या, वेटरनं दिलेल्या पदार्थांच्या ललकाऱ्या, वेटरनं खांद्यावरच्या कापडानं फलकारे मारून साफ केलेलं टेबल आणि अर्थातच चहा, बनमस्का, दट्ट्या ओढून…
यंदाच्या निवडणुकीबाबतची काही निरीक्षणं. राजकीय पक्षांनी मतदारांचं रूपांतर जात-धर्माच्या मतपेढ्यांत करून टाकलं आहे. मतदारही ( अल्पांश अपवाद ) जात वा धर्म या समूहमानसानंच मतदान केलं. या निवडणुकीपुरतं तरी म्हणता येईल की माणूस समूहात विरघळला आहे. मतदान करतांना, राजकीय निर्णय घेताना तो समूहमनानं विचार करतो, व्यक्ति म्हणून निर्णय घेत नाही. आर्थिक प्रश्नाबाबत राजकीय पक्ष विचार करायला तयार नाहीत, मतदारही त्याना आर्थिक प्रश्नावर बोला असं ठामपणे बोलले नाहीत. आर्थिक प्रश्न महत्वाचे अशासाठी की आपल्याला कोणता अर्थविचार हवा आहे याचा विचार राजकीय पक्ष…
नॅचरल शुगर या कारखान्यानं केलेल्या दोन कामांचे व्हिडियोज सोबत. एक काम म्हणजे जलसंधारणाचं. जलसंधारण म्हणजे पाणी आणि माती टिकवून धरणं. दोन्ही गोष्टी जमिनीत टिकल्या नाहीत तर जमीन निकस होत जाते. दोन्ही गोष्टी जमिनीत टिकवण्याचा परंपरागत नैसर्गिक मार्ग म्हणजे बांध बंदिस्ती. एकेकाळी ते केलं जात असे. परंतू काही शेकडा वर्षं शेतकऱ्याला पोषक अशा व्यवस्था समाजात न झाल्यानं शेतकऱ्याकडं पैसेच उरत नसत. त्यामुळं बांध बंदिस्ती शक्य झाली नाही. परिणामी जमिनी खराब झाल्या. यातून वाट काढण्यासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षात सरकारनं जलसंधारणाची कामं…