Browsed by
Author: niludamle

ग्रीस, चीन, भारतही?

ग्रीस, चीन, भारतही?

ग्रीसवर ३५० अब्ज युरोचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी ग्रीसला आणखी कर्ज घेणं भाग आहे. मागं असंच घडलं होतं. सुरवातीला ११० अब्जाचं कर्ज घेतलं. ते फेडण्यासाठी आणखी २४० अब्जाचं कर्ज घेतलं. आणि आता ते फेडण्यासाठी पुन्हा कर्ज हवंय. ऋणको सांगताहेत की खर्च कमी करा, काटकसर करा, त्रास सहन करा. कर वाढवा, खाजगीकरण करा, सार्वजनिक क्षेत्रावरचा खर्च कमी करा. त्या अटी ग्रीकांना अमान्य दिसताहेत. कर्ज घेतल्यावाचून गत्यंतर नाहीये. तेव्हां नवे दाते शोधण्याच्या खटपटीत ग्रीक सरकार आहे. दाते मंडळींकडून घातल्या जाणाऱ्या अटी…

Read More Read More

व्यापम घोटाळा

व्यापम घोटाळा

२०१४ च्या कालनिर्णय दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख. लेखात टू जी आणि व्यापम या दोन घोटाळ्यांचा धांडोळा होता. पैकी व्यापम प्रकरण पुन्हा गाजू लागल्यानं त्या लेखातला व्यापमसंबंधी भाग इथं पुन्हा. ।। मिहीर कुमार हा तरूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के सुदर्शन यांच्याकडं काम करत असे. सेवादार होता. त्याची अन्न निरीक्षक, फूड इन्सपेक्टर या पदावर मध्य प्रदेश सरकारच्या खात्यात काम करायची इच्छा होती. त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही २००७ सालातली हकीकत. मिहीरनं परीक्षेबाबत चौकशी केली, केव्हां, कुठं, विषय कोणते वगैरे. …

Read More Read More

वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, छगन भुजबळ.

वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, छगन भुजबळ.

ललित मोदी प्रकरण थंडावलंय. माध्यमांच्या खोदकामातून आता नवं काही बाहेर निघत नाहीये.  प्रकरण असं. ललित मोदी नावाचा एक माणूस. समाजातल्या तालेवार घराण्यांशी संबंध असलेल्या घराण्यात जन्मला. वसुंधरा राजे या राजघराण्याशी मोदी घराण्याचे कौटुंबिक संबंध. त्यामुळं मोदी राजे घराण्यातल्या वातावरणात, त्या निमित्तानं राजस्थान सरकारात लीलया वावरत असे, घरचं असल्यागत. खेळा भोवती त्यानं आपलं जाळं गुंफलं. राजस्थान क्रिकेटचा वापर करून तो देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे घुसला. मॅचेस खेळवणं, स्टेडियम इत्यादी व्यवस्था ताब्यात घेऊन त्यांचा वापर करणं यामधे त्यानं करियर केलं. सुरवातीला राजस्थानात,…

Read More Read More

माणसाचा छळ करणाऱ्या प्रथा बंद व्हाव्यात

माणसाचा छळ करणाऱ्या प्रथा बंद व्हाव्यात

गणेशोत्सवाचे वेध लागलेत. मुंबई ऊच्च न्यायालयानं निकाल दिलाय की मुंबईच्या रस्त्यावर खड्डे खणून मंडप बांधण्याला सरकारनं प्रतिबंध करावा. कानठळ्या बसवणारं संगित आणि विविध आवाजही रस्त्यावर असू नयेत असं न्यायालयानं आधीच सांगितलं आहे. न्यायालयाचं हे म्हणणं केवळ गणेशोत्सवालाच नाही तर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला लागू असेल. सर्व धर्मांचे सण त्यात आलेच पण लग्नं, बारशी, वाढदिवस इत्यादिही त्यात आले. शाळा कॉलेजांत होणारे विविध कार्यक्रमही त्यात आले.  नागरिकांना होणारा त्रास वाचवणं हा प्रमुख उद्देश. एका मर्यादेपलिकडचा आवाज माणसाचं आयुष्य कमी करतो हे सिद्ध झालेलं…

Read More Read More

मॅगी… मॅगी

मॅगी… मॅगी

गंधर्व चौकातली  साई निवास इमारत. तीन मजली. इमारतीच्या तळाशी   फूटपाथवर नूडल्सवाली गाडी. गाडीपाशी वर्दळ. ‘ दो प्लेट मॅगी ‘… ‘ एक प्लेट मॅगी ‘ … ‘ एक प्लेट मॅगी ‘… गाडीला तीनही बाजूनी लोकांनी घेरलं होतं. गाडीवाला मोठ्या कढईत नूडल्स ढवळत होता. मधे मधे चिरलेला कांदा, गाजर आणि ढोबळी मिरची कढईत सोडत होता, ढवळत होता. ‘ दो मिनिट रुको. अभी तय्यार होगा.’ गाडीवाला गिऱ्हाइकांना थोपवून धरत होता. फूटपाथवर वाटसरूंची वर्दळ होती. गाडीच्या भोवती नूडल्स खाणाऱ्यांचा गोतावळा वाटसरूना अडथळा करत…

Read More Read More

फूटबॉलवाले ब्लाटर क्रिकेटवाल्या श्रीनिवासन यांच्याशी बोलतात तेव्हां

फूटबॉलवाले ब्लाटर क्रिकेटवाल्या श्रीनिवासन यांच्याशी बोलतात तेव्हां

शृंगेरी मठ.  मंत्रोच्चारण चाललंय. श्रीनिवासन यांच्या जानव्याच्या टोकाला बांधलेला फोन थरथरतो. सायलेंटवर असल्यानं आवाज येत नाही. सभोवतालच्या घनगंभीर मंत्रवातावरणात श्रीनिवासन मग्न. श्रीनिवासन यांच्या अंगरक्षकाच्या ते लक्षात येतं. अंगरक्षकही धोतर नेसून त्यांच्या शेजारी बसलेला असतो. साहेबांना डिस्टर्ब करायचा धीर त्याला होत नाही. थरथर थांबत नाही. नाईलाजानं अंगरक्षक श्रीनिवास यांच्या मांडीवर टकटक करतो. एकदा. दोनदा. तिसऱ्या वेळी श्रीनिवासन त्रासिक नजरेनं रक्षकाकडं पहातात. रक्षक हावभाव करून फोन घ्या असं सांगतो. श्रीनिवासन फोनकडं पहातात. क्षणभर फोन घ्यावा की नाही या गोंधळात. उठतात. हॉलच्या बाहेर…

Read More Read More

मोदींचं एक वर्ष. गडगडाट. पाऊस पडत नाहिये.

मोदींचं एक वर्ष. गडगडाट. पाऊस पडत नाहिये.

नरेंद्र मोदींनी एक वर्षापूर्वी केलेल्या झंझावाती प्रचार मोहिमेनं त्यांना लोकसभेत निर्णायक बहुमत दिलं. अच्छे दिन आणण्यासाठी लोकांनी त्यांना निवडून दिलं. प्रचार मोहिम दुपेडी होती. काँग्रेसची नालायकी आणि देशाला सुख देण्याचं ( अच्छे दिन )  आश्वासन. काँग्रेसच्या  नालायकीचे खूप तपशील मोदींनी दिले. सुखाची बाजू सांगताना तपशील न देता सारं काही ठीक करू असं मोघम सांगितलं. आज मोदींचं सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटलं आहे. मोदी परदेशात आणि देशात भाषणं करत फिरत आहेत. अजूनही ते प्रचार मोहिमेत असल्यासारखे वाटतात, निवडून आलेले नेते…

Read More Read More

खडसे, गडकरी यांचे मूत्रविषयक विचार

खडसे, गडकरी यांचे मूत्रविषयक विचार

  नितीन गडकरी हे भाजपचे वाहतुक मंत्री मानवी मूत्र या विषयावर बोलले. ते म्हणाले की शहरातल्या मॉलमधे गोळा होणारं मूत्र गोळा करून त्याचा उपयोग खतं तयार करण्यासाठी करता येईल, तसा विचार सरकार करत आहे. गडकरी नागपुरच्या आपल्या रहात्या घरात मूत्र गोळा करतात आणि झाडांना घालतात. महाराष्ट्रातले भाजपचे मंत्री एकनाथ खडसेंनी गडकरींना दुजोरा दिला, अहमदनगरच्या कृषी विद्यापीठामधे या विषयावर संशोधन केलं आहे असं त्यांनी सांगितलं. ( असं संशोधन झालेलं नाही असं कृषी विद्यापीठाच्या जबाबदार अधिकाऱ्यानं सांगितलं.)  दोघांच्या या विधानांवर माध्यमात धमाल चर्चा…

Read More Read More

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराचीमधे बसमधून चाललेल्या इस्माइली पंथाच्या लोकांवर सहा जणांनी गोळीबार केला. त्यात ४९ व्यक्ती मारल्या गेल्या, वीसपेक्षा जास्त जखमी झाल्या. मृतांत स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं होती. हल्ला नियोजित होता. इस्माइली माणसं अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी बसमधून अमूक वेळी जाणार आहेत हे हल्लेखोरांना माहित होतं. हल्लेखोर तीन बाईक्सवरून आले आणि बसवर दोन बाजूंनी हल्ला केला. काही मिनिटं ही घटना घडली. हल्लेखोर पळून गेले.  सुरवातीला जुंदाल्ला या संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्विकारली. जुंदाल्ला ही संघटना तहरिके तालिबान या पाकिस्तानी तालिबान या छत्री संघटनेचा…

Read More Read More

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

कायदा या कल्पनेवर भारताचा विश्वास नाही. कायद्याला अनेक पर्याय भारतीय जनतेनं शोधले आहेत. कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो. सलमान खान खटल्याची सुरवात अशी झाली. २८ सप्टेंबर २००२ च्या  मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फूटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची तपासणी करून त्याला सोडून दिलं. २९ रोजी माध्यमांमधे ही घटना लोकांना पहायला मिळाली. ३० तारखेच्या पेपरात सविस्तर बातम्या आल्या. तरी सलमान बाहेर. जणू काही घडलंच नव्हतं.  त्या वेळी निखील वागळे…

Read More Read More